शिबीरामध्ये एकुण 80 रक्तदात्यांनी केले रक्तदान
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली जिल्हयाचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांचे मार्गदर्शनात हिंगोली जिल्हा पोलीस दलाकडुन नेहमीच विवीध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. जनता व पोलीस यांच्यातील संबंध अधिक जवळचे व्हावे तसेच जातीय व सामाजिक सलोखा अबाधित राहुन शांतता नांदावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सदैव प्रयत्न करत आहे.
त्याचाच एक भाग म्हणुन सध्या सदर उपक्रमांतर्गत संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर कौमी एकता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या हिंगोली जिल्हयात रक्तपेढीमध्ये रक्ताची कमतरता लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांचे पुढाकारातुन व मार्गदर्शनात तसेच जिल्हा सामाण्य रूग्णालय येथील रक्तपेढी व रक्त विघटन केंद्र यांचे सहकार्यातुन दि.16/12/2023 रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. सदर शिबीराचे उदघाटन मा. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. मंगेश टेहरे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.दिपक मोरे यांचें हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी वैदयकिय अधिकारी डॉ.स्वाती नुनेवार, डॉ.कंठे पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, राखीव पोलीस निरीक्षक अलीमोददीन शेख, सहा. पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु ईतर पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच जिल्हा रक्तपेढी व रक्त विघटन केंद्रातील कर्मचारी हजर होते.
सदर रक्तदान शिबीरात जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच शहरातील व जिल्हयातील नागरीक, जिल्हा न्यायालयातील अभियोक्ता यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवुन सदर शिबीरात एकुण 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा