बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणऱ्यांविरुध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात गुन्हयांना आळा घालण्याचे तसेच बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणऱ्यांविरुध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, विकास पाटील, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. शिवसांब घेवारे यांचे पथकाने आपले गोपनीय माहितगार सतर्क करून, मालाविरुध्दच्या गुन्हयाबाबत माहिती घेत होते.
गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दि.06 डिसेंबर रोजी नागोराव सुखदेव श्रीरामे, (वय 26 वर्ष, रा.हनकदरी, ता.सेनगाव, जि.हिंगोली) हा कमलानगर येथील एका महीलेच्या घरात घुसुन अंगावरील सोन्या चांदीचे दागीने जबरीने चोरून नेला आहे. या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखा हिंगोली चे पथकाने त्या महिलेची भेट घेउन विचापुस केली असता घटनेमध्ये सत्यता आढळून आली. परंतु आरोपीने पिडीत महिलेस पोलीस मध्ये तकार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने, महिलेने पोलिस स्टेशनला अदयाप गुन्हा दाखल केला नसल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी महिलेला सुरक्षेबाबत विश्वास देउन हिंगोली शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यास सांगितले.
अशा प्रकारचे गुन्हे करणार्या आरोपीची गोपनिय माहिती काढली असता, हा गुन्हा हा रेकॉर्ड वरिल गुन्हेगार नागोराव सुखदेव श्रीरामे याने केल्याचे समजले. त्या वरून आरोपी नागोराव श्रीरामे यास हिंगोली येथे लोखंडी तलवार सह ताब्यात घेवुन, त्याचेविरुध्द हिंगोली शहर पोलिस स्टेशन गुरनं.950/2023 कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे नमूद आरोपीस विश्वासात घेवून पो.स्टे.हिंगोली शहर गुरनं. 949/2023 कलम 394 भा.दं. वि. या गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने काही दिवसापुर्वी कमलानगर, हिंगोली येथे एका महिलेस तिचे राहते घरात घुसुन तिचे अंगावरील सोन्या-चांदिचे दागीने जबरीने चोरून नेले बाबत कबुल दिलेने त्याचेकडुन कानातल्या सोन्याच्या काडया, गळयातील सोन्याची पोत, हातातील चांदिचे काकणे, एक अॅन्ड्रॉईड मोबाईल असा जबरीने चोरून नेलेला एकुण 86,445/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीवर यापुर्वी सुध्दा नर्सी हददीतील पहिनी व घोटा देवी येथील महिलांच्या अंगावरील दागीने जबरीने चोरल्या बाबत व घरफोडीचे तसेच मुलींना पोलीस भरतीचे आमीष दाखुन फसवणुक केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही सदरची कारवाई हिंगोली पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार राजुसिंग ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र सावळे, प्रशांत वाघमारे, इरफान पठान यांनी केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा