मायेची ऊब
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी संभाजी नगर फुलंब्री तात्याराव बनसोडे
आपण समाजाचे काही देणे लागतो....या भावनेने सतत काही ना काही सत्कर्म करत आपल्या कृतीतून नव पिढीला सत्कर्माचा मार्ग दाखविणाऱ्या आपल्या परिसरातील एंग & फिट सिनिअर सिटीजन्स ग्रुप च्या वतीने गोर-गरिबांना, दिन-दुबळ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
यासाठी दि. २०, बुधवार रोजी ही वयस्कर मंडळी रात्री ११.०० वाजता आप-आपल्या घरून निघाली. रात्रीच्या बोचऱ्या थंडीत रेल्वे स्टेशन, बस स्थानक, घाटी, शहरातील उड्डाण पूलं, चौक आदी परिसरात फिरत या वडीलधाऱ्या मंडळीने उघड्यावर कुड-कुडत झोपलेल्या गरजवंतांवर पांघरून टाकून त्यांना मायेची ऊब दिली.
या कार्यात एंग अँड फिट सिनिअर सिटीजन्स' ग्रुपचे बालाभाऊ लोया, बाबुरावजी नरवडे, दिलीपकुमार खिवंसरा, सोनवणे काका, बजाज अंकल, अग्रवाल अंकल, पटेल साहेब, ठाकरे साहेब, गायकवाड साहेब आदींनी पुढाकार घेतला....
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा