१३ वर्षाची मुलगी आणि २२ वर्षाचा मुलगा ४ दिवसांपासून होते गायब
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा शिवारातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गळ्यात गळे घालून दोघांनी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे या घटनेतील मुलगी केवळ ८ व्या वर्गात शिकणारी १३ वर्षाची विद्यार्थिनी आहे. दोघेही गेल्या ४ दिवसापासून बेपत्ता होते.
प्राप्त माहितीनुसार एक मुलगी (वय१३, वर्ष रा. शेंदुर्जन) व मुलगा गोपाल समाधान खिल्लारे(वय २२रा.शेंदुर्जन) या दोघांनी साखरखेर्डा शिवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघेही १८ डिसेंबर पासून बेपत्ता होते. मुलीच्या आईने १८ डिसेंबरला साखरखेर्डा पोलीस ठाण्यात त्यांची मुलगी गायब झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरून त्याच दिवशी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान ,२२ डिसेंबरला संध्याकाळी एका मुलीचा आणि मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर दोघांची ओळख पटली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने प्रेमात अडथळा येत होता, त्यामुळेच हा टोकाचा निर्णय घेतला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान ४ दिवसांपासून दोघे गायब असल्याने त्यांनी आत्महत्या कधी केली,याबाबत अजून अस्पष्टता आहे. मात्र प्रेमाचे काळे अन् तितकेच भयानक वास्तव या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून पोलीस डायरीत नोंद घेतली असून शेव विच्छेदानंतर नेमकी त्यांनी आत्महत्या कधी केली हे समजणार आहे. त्याचबरोबर आत्महत्येचे कारण काय आहे याचा पोलीस तपास करत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा