maharashtra day, workers day, shivshahi news,

विकसित भारत संकल्प यात्रेला खरबी येथील गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योनजेचा लाभ सर्व वंचित घटकांनी घ्यावा - खासदार अनिल बोंडे व आमदार तानाजी मुटकुळे यांचे आवाहन
Developed India Sankalp Yatra ,MP Anil Bonde MP Tanaji Mutkule's appeal ,  Hingoli , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ सर्व वंचित घटकातील समाजाला मिळवून देण्यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा आपल्या गावापर्यंत येत आहे. याची देण्यासाठी आज हिंगोली तालुक्यातील खरबी येथे ही संकल्प यात्रा पोहचली आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी, कामगार, महिला तसेच युवा वर्गाच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना शासन राबवत आहे. या सर्व योजनांचा लाभ सर्व वंचित घटकातील समाजाने घ्यावा, असे आवाहन खासदार अनिल बोंडे व आमदार तानाजी मुटकुळे यांनी यावेळी केले. आज खरबी येथील विकसित भारत संकल्प यात्रेला गावकऱ्यांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. 

  आज हिंगोली तालुक्यातील मौजे खरबी (बेलवाडी) विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अमरावतीचे खासदार अनिल बोंडे, हिंगोली विधानसभा मतदार संघाचे आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, गटशिक्षणाधिकारी बिरगणे, मुख्याध्यापक आबाराव गाढवे, ग्रामसेवक अरविंद सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक आम्ले, तालुका अभियान व्यवस्थापक राजू दांडगे, तालुका  व्यवस्थापक आर्थिक समावेशन सिद्धार्थ पंडित, समुदाय आरोग्य अधिकारी दिपके, सरपंच कमळाबाई बाजीराव बोचरे, पोलीस पाटील गोपाल शिंदे, मंदा मांडगे, लक्ष्मण मांडगे, ग्रामपंचायत सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर अनिता भोरगे, रोजगार सेवक बद्री बोचरे, प्रभाग समन्वयक अरविंद धाबे, तंटा मुक्ती अध्यक्ष खंदुजी शितोळे, सीआरपी मिराबाई धाबे, पल्लवी पवन शिखरे, मुटकुळे ताई, सयाबाई शिंदे, सर्वच अधिकारी व कर्मचारी तथा समूहातील सर्व महिला व गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
विकसित भारत संकल्प यात्रेत आज खरबी येथे केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरिता शासनाने पाठविलेल्या एलईडी रथामधून देण्यात आली. याप्रसंगी गावातील महिला व पुरुष मंडळींनी या एलईडी रथासोबत आलेल्या विविध योजनांचा लाभ घेतला. यामध्ये आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, उज्वला गॅस योजना, घरकुल योजना, आरोग्य तपासणी यासारखे विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !