चिखली येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
देवळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील सेवानगर भागात मागील काही दिवसांपासून डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन तब्बल चार ते पाच रुग्ण हे चिखली येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार
मागील काही दिवसांपासून सेवानगर येथील नागरिकांना तापाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी चिखली येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल केले असता त्यांना डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चिखली येथे उपचार सुरू आहेत. त्यातील दोंघानां बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करावे लागले असुन या संपूर्ण घटनेने सेवानगर येथील नागरिकांमध्ये कमालीचे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे आणि थंडीमुळे सर्दी, ताप, खोकला यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तसेच सेवानगर येथे आरोग्य विभागाने तात्काळ अलर्ट होण्याची गरज निर्माण झाली आहे. आज निसर्गाच्या लहरीपणा मुळे ग्रामीण भागामध्ये बेरोजगार वाढली आहे आणि त्यामध्ये अंढेरा येथील सेवानगर येथे डेंग्यू सदृश्य तापेचे थैमान सुरू झाले आहे. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असून सुद्धा नियोजन शून्य कारभारामुळे ग्रामीण भागामध्ये प्राथमिक उपचार मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा