आमदार खासदार झोपेत जनता मात्र त्रस्त
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर -कोकलेगाव -नायगाव कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या कोकलेगाव पुलाला तब्बल दहा वर्षाचा कालावधी लागला याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अधिकारी व या भागाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश पवार या भागाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण या भागाचे माजी खासदार अशोकराव चव्हाण सध्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर असे बडे नेते याच्यात लक्ष घातले नसल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. दहा पावसाळी गेले तरीही नागरिकांना चिखलातून रस्ता काढून नागरिकांना ये जा करावे लागत आहे .
मात्र तब्बल मातभर नेत्याचे गाव मात्र काम धंदा हरी गोविंदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.नेते मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत .कोकले गाव पुलाचे बांधकाम होऊन तयार झाले मात्र दोन्ही बाजूने रस्ता नसल्याने सदर आजही एक किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्या चिखल माती दगड धोंडे पाणी पावसामध्ये तसेच प्रवास करून नागरिक खीळखीळ होऊन गेले आहेत . तरीही कोणत्या नेत्याला जाग येत नाही मात्र निवडणूक आली की सर्व गाव परिसरात खेड्यात जाऊन मते मागण्यासाठी हात जोडतात मात्र नागरिकांचा त्रास दुर करण्याची हिंमत नसलेल्या या नेतेमंडळीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिकांनी मात्र चांगलेच अद्दल घडवण्यात यावी अशी चर्चा मात्र कुंटूर परिसरामध्ये घडत आहे.
आमदार राजेश पवार यांना फोनवरून माहिती घेतली असता बोलण्यास तयार नव्हते प्रतापराव पाटील चिखलीकर यांना फोन केला असता ते म्हणतात की बघू करू अशी घोषणा दिल्यामुळे नागरिकांच्या प्रश्नाकडे कोणालाच घेणे देणे नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र निवडणुकीमध्ये पैसा फेकून तमाशा देख अशी परिस्थिती राजकीय नेते करत असल्याने जनता मात्र भरडत चालली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा