दादा करकंबकर यांचा घणाघात
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी अमोल कुलकर्णी)
देशात कोळी समाजच्या पन्नास पेक्षा जास्त उपजाती आहेत. पण जात प्रमाण पत्र पडताळणी तहसीलदार ऐवजी विभागीय स्तरावर करायला शरद पवार कारणीभूत आहेत असा घणाघात दादा करकंबकर यांनी खर्डीतील शाखा उद्घाटन प्रसंगी केला.
महर्षी वाल्मिकीनी लिहिलेले "रामायण" याच्या पेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, कोळी बांधव आणि परिचारक कुटुंबाचे फार पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत. तुमच्या सर्व प्रश्नांसाठी आम्ही पक्ष पातळीवर कायम बरोबर राहू अशी ग्वाही युवक नेते प्रणव परिचारक यांनी दिली.
तालुक्यातील जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथे महर्षी वाल्मिकी संघाचे उदघाटन युवक नेते प्रणव परिचारक आणि संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या उपस्थितीत पार पडले.
गावातील कोळी समाजाची संख्या विचारात घेता हवा तितका विकास झालेला नाही. महादेव कोळी प्रमाणपत्रे वैध ठरत नसल्याने अनेक तरुणांना बेरोजगार राहण्याची वेळ आली असल्याची खंत शाखा अध्यक्ष दत्तात्रय कोळी यांनी बोलून दाखवली.
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य कोळी बांधव पदाधिकारी जमलेले होते. दादासाहेब करकंबकर, उचेठाणचे सरपंच रमेश कोळी, बाबासाहेब आधटराव, शाखा प्रमुख समाधान कोळी, आकाश माने, बिभीषण कोळी, अभिमान कोळी, गणेश भंडारे, तानाजी कोळी, तुषार कांबळे, हणमंत भंडारे, बाळासाहेब बळवंतराव, बब्रुवाहन कोळी यांच्यासह सरपंच पती भगवान सव्वाशे, उपसरपंच शरद रोंगे, माजी सरपंच रमेश हाके आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा