निवडणूकीत भाजपाचे घवघवीत यश
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
देशात पाच राज्यात विधानसभे साठी नुकतेच मतदान पार पडले .रविवारी मतमोजणी होऊन निकाल भाजपच्या बाजुने येत चार पैकी तीन राज्यात भाजपाला बहुमत मिळाले या विजयाबद्दल आ.राजेश पवार यांच्या समर्थकांनी नायगाव येथील हेडगेवार चौकात पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
देशात पाच राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडली रविवारी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा मध्ये मतमोजणी होऊन तीन राज्यातील मतदारांनी काँग्रेसला नाकारत भाजपाला बहुमत दिले .त्या मुळे मोदी लाट असल्याचे दिसुन आले . तीन राज्यात भाजपाचे सरकार आल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह वाढल्याचे दिसुन येत आहे.
तीन राज्यात विक्रमी आघाडी घेतल्याचे निश्चित झाल्यानंतर नायगाव विधानसभा मतदार संघाचे आ.राजेश पवार यांचे समर्थक नायगाव हेडगेवार चौकात जमा झाले. देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर पेढे वाटून फटाके वाजवून तरुणांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी तालुकाध्यक्ष दता पा. ढगे , बाबासाहेब हबर्डे, श्रीहरी देशमुख, देविदास पा.बोमणाळे , सुर्यकांत पा.कदम प्रकाश पा.हेडगे, माधव पा.कल्याण, गंगाधर पा.कल्याण, परमेश्वर पा.सोमठाणकर,साईनाथ पा.हेंडगे,मनोज पा. कदम ,प्रताप पा. बोमनाळे ,राजु पा.बेळगे आवकाश पा. धुप्पेकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
- तेलंगणा मुधोळ वि.स. उमेदवाराच्या विजयात आ.पवारांचा सिंहाचा वाटा
- नायगाव विधानसभेचे कार्यसम्राट आ. राजेशजी पवार यांना मुधोळ विधानसभेचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली होती आमदार राजेश पवार यांनी मुधोळ येथे अनेक दिवस मुक्कामी राहून मुधोळ विधानसभेतील प्रत्येकक गाव न गाव प्रचार माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या मुधळ विधानसभेतील भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्व मतदारात एक नवचैतन्य निर्माण करून पिंजून काढत भाजपाचे मुधोळ विधानसभेचे उमेदवार रामराव पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांना निवडून आणण्यासाठी लोकेश्वरम, लोसरा,कुबेर,भैंसा,तानुर, बासर या मंडळातील सर्वे गाव व पिंजून काढण्यासाठी अनेक दिवस मुक्कामी राहून रामराव पाटील यांना प्रचंड मताने विजयी* करण्याचा संकल्पधरून कार्य पार पाडले त्यामुळे रामराव पाटील यांचा 23000 एवढ्या मतांनी विजयाचा पर्व गाठला आहे या उमेदवारांच्या विजयात आ. राजेश पवार यांच्या सिंहाचा वाटा असल्याचे मत श्रीहरी देशमुख नरंगलकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा