ग्रामस्थांनी रोखले रस्त्याचे निकृष्ट काम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मोजे घुंगराळा येथे ग्रामपंचायतच्या वस्ती मध्ये सी सी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामविकास अधिकारी हनुमंत शिंदे यांच्या उपस्थित हे काम चालू आहे. सदर सीसी रस्ता चे काम चिखलाच्या रस्त्यावरच शिलकोट मिश्रित गीटीचा थर टाकून त्यावर बांधकाम सीसी रस्ता बनवण्यात येत असल्याने नागरिकांनी ओरड सुरू केली असूनही सदर रस्ता बंद करा काम करू नका .
चांगल्या दर्जा चे काम करा सिमेंट टाकून बांधकाम करा अशी नागरिकांनी सांगितले. ग्राम विकास अधिकारी हनुमान शिंदे यांनी सदर रस्ता हा अर्धाच बनवण्यात येणार होता मात्र आम्ही सरपंच यांना विचारून पूर्ण रस्ता केला आहे. त्यामुळे हे काम अतिरिक्त होत आहे. त्यामुळे असे करत आहोत अशी यावेळी त्यांनी सांगितले . रस्ता चे बांधकाम हे चिखलावर होत आहे रस्ता दबून काही दिवसात फुटून जाईल असे सांगितल्याने ग्रामविकास अधिकारी यांनी दुर्लक्ष केले व काम पूर्ण करण्यासाठी सांगितले त्यामुळे येथील नागरिक यांनी काम बंद पाडले आहे. घुंगराळा येथील ग्रामपंचायत वतीने निकृष्ट दर्जाचा काम होत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा