मागील ३ वर्षापासुन शेतात अतिृष्टीमुळे आले नाही कुठलेच पिक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
आदमपुर: बिलोली तालुक्यातील आदमपुर येथील हाजेप्पा मष्णाजी झेलते (३९) या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्जास व सततच्या नापिकिस कंटाळुन राहत्या घरात ता.५ रोजी रविवारी पहाटे ४ वाजता गळफास घेऊन जीवनयात्रा संपवत आत्महत्या केली आहे.
आदमपुर येथील हाजेप्पा मष्णाजी झेलते हे अल्प भूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावे केवळ ३७ गुंठे कोरडवाहू जमीन असून सदरच्या जमिनीवर भारतीय स्टेट बँक रामतीर्थ शाखेचे ३९ हजार रुपये कर्ज आहे. व मागील ३ वर्षापासुन शेतात अतिृष्टीमुळे कुठलेच पिक न आल्याने व संसाराचा गाडा कसा चालवायचा व मुलांचे शिक्षणाचे खर्च कसे करायचे तसेच बँकेचे कर्ज कसे फेडायचे या अर्थिक विवेचानातून ता.५ रोजी पहाटे ४ वाजता घरातील सर्व सदस्य झोपेतून उठण्या आगोदर घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन घराच्या तुळइस एका दोरखंडाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवत आत्महत्या केली आहे.
सदरील घटनेची माहिती रामतीर्थ पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस बीट जमादार प्रकाश तमलूरे, व्यंकट बोडके यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस पंचनामा करून मयत शेतकऱ्यांचे मृतदेह बिलोली येथे उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवले. मयत शेतकऱ्यांचे शवविच्छेदना नंतर त्याच दिवशी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, २ भाऊ, १ बहिण, भावजय असा मोठा परिवार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा