सकल मराठा समाजाची मागणी गृहमंत्र्यांच्या नावे दिले निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
दिनांक ६ नोव्हेंबर रोजी निवेदन नायगाव तहसील कार्यालय मार्फत मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले.
नायगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यव्यापी बंद मध्ये आरक्षणासाठी सहभागी होत दिनांक 31 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील सर्वत्र सकल मराठा बांधव आंदोलनात मनोज पाटील जरांगे यांना जाहीर पाठिंबा देत सहभागी झाले होते. तालुक्यातील काही ठिकाणी आंदोलन दरम्यान करण्यात आले होते. काही समाजकंटकांकडून त्या ठिकाणी दंगा घडविण्यात आला. त्याचे परिणाम निष्पाप मराठा समाजाला भोगावे लागत आहेत.
त्याचा फायदा घेत वरिष्ठ राजकीय दबाव तंत्राने आमच्या बांधवांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले व अटक करण्यात आले आणि अजूनही काही बांधवांना मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे हे सकल मराठा समाज नायगाव तालुका अजिबात खपून घेणार नाही. तरी आमच्या बांधवांवरील दाखल झालेले गुन्हे हे त्वरित मागे घेण्यासाठी मा.तहसीलदार तहसील कार्यालय नायगाव बाजार यांच्या मार्फत मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व तसेच
मा.जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना कळविण्यात आले असून सकल मराठा समाजाला त्रास देण्यात येऊन नये अन्यथा आमच्या रोशाला सामोरे जावे लागेल याची गांभीर्याने राजकीय पुढार्याने दखल घेऊन आमची दिवाळी व जेलमध्ये असलेल्या बांधवांची दिपवाळी गोड करावी ही सकल मराठा समाज नायगाव च्या वतीने कळविण्यात आले आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा