वाघलवाडा कारखाना अंतर्गत शेलगांव येथील शेतकरी भगवान लक्ष्मणराव ढगे यांना २५००० हजार पारितोषिक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या वाघलवाडा साखर कारखाना एम. व्ही. के अँग्रो फूड प्रॉ लि. कुसुमनगर, येथे लागवड हंगाम - 2020-21 मध्ये एकरी सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा बक्षीस स्वागत समारंभ व धनादेश वितरण, तसेच उल्लेखनीय काम करणान्या कर्मचारी यांचे धनादेश बक्षीस वितरण सोहळा सपन्न झाला. यावेळी उमरी विभागातून सर्वात जास्त एकरी उत्पन्न काढलेले शेतकरी श्री. भगवान लक्ष्मण ढगे रा . शेलगांव ता उमरी प्रती एकरी 83.820 में टन यांना रोख रक्क्रम- 25000/- व द्वितीय क्रमांक श्री. धनसिंग धर्मा पवार रा. सिंधी तांडा प्रती एकरी 79.0 में यांना रोख रकम - 15000/- तृतीय क्रमांक श्री. वसंत धनसिंग राठोड सावरगाव गेट भोकर विभागास त्यांनी (68.430. मेट टन) रोख रक्कम -11000/- चा धनादेश देवून सत्कार करण्या आला.
तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचा-यांचा सुद्धा व्हिपीके उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांचे हस्ते धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उमरी विभागाचे अग्री ओव्हरसियर श्री. अनुरथ निशा शेळके यांना रोख रक्कम 25,000/- श्री. मधुकर साहेबराव कदम शेलगांव यांना रोख रु. 21,000/-
श्री. भास्कर बालाजी पुयड रोख रु. 11,000/- . भोकर विभागाख श्री. प्रताप मारोतराव सुर्यवंशी यांना रोख रक्कम 11,000/- माधव बालासाहेब हुरणे यांना रोख रु. 7000/- देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात चेअरमन मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी, कर्मचान्यांना सांगितले की, प्रत्येक गावातून तरुण शेतक-याला उस, पिकांविषयी व दुग्ध व्यवसायांवर पृवत करावे. प्रत्येक कर्मचान्याने शेतकऱ्यांचे उत्पादन कोणत्या मार्गाने वाढ होईल याबद्दल सर्वांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी, संचालक प्रभाकर पाटील पुयड,, संचालक गणेशराव पा. सरसे, सिईओ संदीप पाटील कवळे एकनाथ पा. कदम, लक्ष्मणराव पा.हरेगावकर , भगवान पाटील चव्हाण, गांडूळ खत मार्गदर्शक भांगे साहेब, अंबटवार साहेब, जंनरल मॅनेजर पि.एम. पवार साहेब मुख्य शेतकी अधिकारी श्री. रफिक साहेब, उस विकास अधिकारी एस.जी.सावंत,श्री. यु.जी. कदम साहेब जनसंपर्क अधिकारी एम. व्ही. के अँग्री श्री. नादरे साहेब, सर्व शेती विभागातील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. सावंत साहेब - ऊसपुरवठा अधिकारी यांनी केले तर आभार श्री. यु.जी,कदम साहेब यांनी व्यक्त केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा