maharashtra day, workers day, shivshahi news,

ग्रामपंचायत निवडणूकीत प्रत्येक राजकीय पक्षाचा आपणच सर्वांत मोठा पक्ष ठरल्याचा दावा

तालुक्यातील २७ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर 
Gram Panchayat Election , MLA samadhan autade , mangalwedha , pandharpur , shivshahi news .

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आ.समाधान आवताडे यांचे मंगळवेढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व असल्याचा केला दावानुकत्याच संपन्न झालेल्या मंगळवेढा तालुक्यातील एकूण २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूकांमध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार समाधान आवताडे यांच्या विचारांनी २७ पैकी तब्बल १३ ग्रामपंचायतींवर आपले एकहाती वर्चस्व राखत विजयाचा झेंडा फडकवला आहे.या टप्प्यात झालेल्या या निवडणुकीमध्ये आ आवताडे यांच्या नेतृत्वाखाली जुनोनी, देगाव, अकोले, बठाण उचेठाण, महमदाबाद हु, जंगलगी , मुंढेवाडी, लमाणतांडा, लक्ष्मीदहिवडी, नंदूर, हिवरगांव, निंबोणी या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आ आवताडे यांच्या राजकीय विचारांच्या शिलेदारांनी एकहाती विजयाची कमान उभी केली आहे.तर उर्वरित खडकी, शेलेवाडी, भाळवणी, खुपसंगी, रड्डे, जालिहाळ, ब्रह्मपुरी या ७ ग्रामपंचायतवर आ आवताडे यांच्या गटातील उमेदवारांनी स्थानिक पातळीवर आघाड्या करुन सदस्य पदावर आपली विजयी बाजी मारली आहे.


सर्व विजयी नूतन पदाधिकाऱ्यांचा आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे कृषी बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये फेटा बांधून सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच विनायक यादव, विजय माने,  माजी संचालक पप्पू काकेकर, भारत निकम, सरपंच शिवाजी सरगर यांच्यासह तालुक्यातील इतर मान्यवरांनी सर्वच विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची आमदारकी आपल्या खांद्यावर घेतल्यापासून आमदार अवताडे यांनी कोणताही राजकीय आकस मनामध्ये न ठेवता मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या मूलभूत व पायाभूत विकासासाठी सलोख्याचे समाजकारण व राजकारण करून मतदार संघाच्या विकासाला गती दिली आहे. आमदार आवताडे यांच्या या विकासाभिमुख दूरदृष्टीचा या ग्रामपंचायत निकालांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.


२१ ग्रामपंचायतीवरती मा.आ.प्रशांत परिचारक प्रणित समविचारी गटाची सत्ता आल्याचा दावापंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची आमदारकी आपल्या खांद्यावर घेतल्यापासून आमदार अवताडे यांनी कोणताही राजकीय आकस मनामध्ये न ठेवता मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या मूलभूत व पायाभूत विकासासाठी सलोख्याचे समाजकारण व राजकारण करून मतदार संघाच्या विकासाला गती दिली आहे. आमदार आवताडे यांच्या या विकासाभिमुख दूरदृष्टीचा या ग्रामपंचायत निकालांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

२१ ग्रामपंचायतीवरती मा.आ.प्रशांत परिचारक प्रणित समविचारी गटाची सत्ता आल्याचा दावा
बबनराव आवताडे गटाने दावा केलेली गावे -
लक्ष्मी दहिवडी, देगाव ,शिरशी, निंबोणी, मल्लेवाडी ,भाळवणी ,अकोले मुंडेवाडी ,रेवेवाडी, जंगलगी, पडोळकरवाडी, महमदाबाद, हुनूर, खुपसंगी, खडकी ग्रामपंचायतीवर बबनराव आवताडे गटाच्या ताब्यात आल्या असल्याचे दावे करण्यात आले आहेत.


चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतवर झेंडा फडकला 
शरद पवार गटाचे अभिजीत पाटील यांचा ग्रामपंचायतवर झेंडा फडकला असल्याचा दावा केलामंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीमध्ये पंचवार्षिक निवडणूक लागली असता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते अभिजीत आबा पाटील यांनी काही ठिकाणी स्वतंत्र पॅनल तर काही ठिकाणी समविचारीच्या माध्यमातून आपला पॅनल उभा करण्यात आलेला होता. यातूनच अभिजीत पाटलांना घवघवीत यश प्राप्त झालेले दिसून येत आहे.
यामध्ये काही ठिकाणी सरपंच तर काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पदाची बाजी अभिजीत पाटील यांच्या गटाने मारलेली दिसून येत आहे.
एकीकडे राज्यामध्ये अजित पवार व शरद पवार यांच्यामध्ये फूट पडून देखील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे खंबीरपणे शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहून शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले असता अभिजीत पाटील हे मंगळवेढा तालुक्यात जोमाने व गावोगावी फिरवून आपला गट व पक्ष बांधणीमध्ये व्यस्त दिसत आहेत.  यामध्येच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची चाचणी झाल्याचे बोलले जात आहे.


यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने ग्रामपंचायतीमध्ये सर्वांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिलेले असून दिसून आले.

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी,  खडकी, देगाव, शिरशी, शेलेवाडी, डिसकळ, निबोंणी, मानेवाडी, रेड्डे, आंधळगाव, खूपसंगी, या ग्रामपंचायतीमध्ये आपले पॅनल निवडून आल्याबद्दल उमेदवारांचे अभिनंदनपर सत्कार श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले.


8 ग्रामपंचायतीवर भालके गट व समविचारी आघाडीचे सरपंच विजयी असल्याचा दावा

मंगळवेढा तालुक्यातील आज झालेल्या ग्रामपंचायत निवडून निकालात भालके गटाचा झंजावत भाळवणी, जंगलगी, चिक्कलगी, शिरसी, खुपसंगी, देगांव, डिकसळ या 7 ग्रामपंचायती वर भालके गटाचे सरपंच विजयी तर लोणार, मानेवाडी आंधळगाव, शेलेवाडी, लक्ष्मी दहिवडी, रड्डे, रेवेवाडी, अकोला या 8 ग्रामपंचायती वर भालके गट व समविचारी आघाडीचे सरपंच विजयी. 

दरम्यान, बरेच ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांनी आम्ही गाव पातळीवर आघाडी करून निवडणूक लढवली असून यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने दावा करू नये असे खाजगीत बोलताना सांगितले

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !