सचिव पदी सुनील हासनपले कुंटुरकर, उपाध्यक्ष येसेकर, कोषाध्यक्ष डाकेवाड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील सध्याचे इकळीमाळ सज्जाचे तलाठी श्री पांडुरंग हाके यांची नायगाव तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली याचवेळी सचिव पदी श्री सुनील रामचंद्र हसनपल्ले कुंटूरकर यांची निवड करण्यात आली सर्वानुमते ही निवड तहसील कार्यालय नायगाव येथील सभागृहामध्ये तहसीलदार मंजुषा भगत यांच्या उपस्थित पार पडली . यावेळी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते . मंडळ अधिकारी व एकूण 26 तलाठी यांच्या उपस्थितीत ही निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी श्री पांडुरंग हाके तलाठी सज्जा ईकळीमाळ , श्री सुनील रामचंद्र हसनपल्ले तलाठी सज्जा वजीरगाव , श्री डाकेवाड तलाठी सज्ज्या राहेर , यावेळी सर्व तलाठी व नायब तहसीलदार येरावार व नायब तहसीलदार देवराये, यांनी श्री तलाठी पांडुरंग हाके व सुनील हसनपल्ले यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या अभिनंदन केले. यावेळी तहसीलदार मंजुषा भगत यांनी व चारही सज्जाचे मंडळ अधिकारी ,आर के पवार यांनी सदर निवडच्या मंडळांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी तहसीलदार मंजुषा भगत ,नायब तहसीलदार येरावार, नायबतशिलदार देवराये, कुंटूर मंडळ अधिकारी आर के पवार, तलाठी काळे जि, एस, बरबडा मंडळ अधिकारी शितल स्वामी, सालेगाव सजा तलाठी पवन कदम ,कोकलेगाव सज्जा तलाठी बी एस मुधळे ,राहेर तलाठी सज्जा डाकेवाड , बरबडा तलाठी संदीप विजयकुमार, वजीरगाव तलाठी सुनील रामचंद्र हसनपल्ले सर्व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा