तालुक्यातील सर्व प्रशासकीय खात्यावर ठेवणार अंकुश
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
आदमपुर - नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शिफारशीवरून बिलोली तालुक्यातील सर्व प्रशासकीय क्षेत्रातील सर्व खात्यावर अंकुश ठेवणारी बिलोली तालुक्यातील एकात्मिक विकासासाठी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली. त्या महत्वपूर्ण समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव मारोती गंगाधर राहिरे आदमपूरकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील रहिवासी असलेले मारोती गंगाधरराव राहिरे हे अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात एक प्रामाणिक युवा कार्यकर्ता म्हणून काम करतात, त्यांनी आज पर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी नेटाने पार पाडत आले आहेत. त्यांनी आज पर्यंत भारतीय जनता पक्षाचे बिलोली तालुक्याचे उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस हे पदे भूषवत आज ते भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा सचिव पदाची जबाबदारी स्वीकारत संपूर्ण जिल्हाभर काम करत असताना त्यांच्या पक्षातील कामाची दखल घेत एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या नावाची जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शिफारस करीत त्यांची बिलोली तालुका समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड केली आहे.
त्यांच्या निवडीचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, व्यंकटराव गोजेगावकर, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड, जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे, बिलोली तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर, विश्वनाथ अब्दागिरे संचालक कृ. उ.बा. समिती नायगांव, राजेंद्र रेड्डी, शंकरराव परशुरे, आबराव संगनोड, शंतेश्वर पाटील, तालुका सरचिटणीस पुरुषोत्तम अब्दागिरे, माजी सरपंच आनंदीदास महाजन, अरविंद पेंटे, माजी चेअरमन, मारोती पा.आवळके यांचे सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा