maharashtra day, workers day, shivshahi news,

दिवाळी सण उत्सवाच्या मुहूर्तावर 37712शिधापत्रिका कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा

तहसीलदार मंजुषा भगत यांची माहिती 
Tehsildar Manjusha Bhagat , Card holders will get a ration of happiness , nanded , shivshahi news.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
राज्य सरकारच्या वतीने गोरगरिबांचा सणउत्सव गोड व्हावा, या संकल्पनेतून दिवाळी सण उत्सवानिमित्त सर्वसामान्य स्वस्त धान्य लाभधारकांना केवळ १००/ रुपयात १ किलो साखर,अर्धा किलो चणाडाळ,अर्धा किलो रवा, १ लिटर पाम तेल,मैदा अर्धा किलो, पोहा अर्धा किलो अशा ६ वस्तु ची किट देण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरिबांचा सण हा गोड होणार असल्यामुळे शिधापत्रिका धारकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

राज्य सरकारच्या संकल्पनेतून दिवाळी, गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून, आनंदाचा शिधा केवळ १००/ रुपयांमध्ये वितरित करण्यात आला होता. त्याचबरोबर आता मराठमोळ्या जनतेच्या व शेतकऱ्यांच्या वतीने याही वेळी दिवाळी सण हा मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून परत एकदा राज्य सरकारच्या वतीने शिधापत्रिका धारकांना १००/ रुपयात ६ वस्तूंचा आनंदाची शिधा संच वितरित करण्यात येत असल्याने सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांमध्ये आनंदाचे वातावरण  दिसून येत आहे.


दिवाळी सण उत्सवानिमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा आपल्या तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे का ? अशी याबाबत पुरवठा  अधिकारी ए.एस.दराडे मॅडम यांना विचारणा केली असता, तहसील कार्यालयाच्या वतीने पुढील प्रमाणे स्पष्टीकरण देण्यात आले. नायगाव तालुक्यात एकूण लाभधारक शिधापत्रिका धारकांची संख्या
37712 एवढी आहे, यात प्राधान्य कुटुंब कार्ड संख्या 29072 एवढी आहे, शेतकरी लाभार्थी कार्ड संख्या 4498 आहे, तर अंत्योदय कुटुंब कार्ड संख्या 4142 एवढी वर्गवारी स्वस्त धान्य लाभधारक कार्ड संख्या असून,या ठिकाणी स्वस्त धान्य साठवणुक गोडाऊनमध्ये आनंदाचा शिधा किट संच उपलब्ध झाला असून, लवकरच 107 स्वस्त धान्य दुकानातून दिवाळी सण उत्सवाच्या मुहूर्तावर सदरचा ६ वस्तूचा आनंदाचा शिधा किट संच केवळ १००/ रुपयात तहसीलदार मंजुषा भगत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली वितरित करणार असल्याचे नायब तहसीलदार (पुरवठा) ए.एस.दराडे मॅडम यांनी सांगितले आहे .

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !