maharashtra day, workers day, shivshahi news,

८ व्या राष्ट्रीय सबज्युनियर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या प्रांजली काळे व प्रांजली जगदाळे यांना सुवर्णपदक प्राप्त

समाजाच्या सर्व स्तरातून होत आहे कौतुकाचा वर्षाव
In the National Subjunior Dodgeball Championship , Pranjali Kale and Pranjali Jagdale get gold medals , pandharpur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
दि. १ ते ५ नोव्हेंबर २०२३ रोजी डाॕजबाॕल फेडरेशन आॕफ इंडीया संलग्नित गुरू नानक इंग्लिश स्कूल शिवपूर - वाराणसी ( उत्तर प्रदेश ) व  वाराणसी डाॕजबाॕल असोशिएशन आयोजित ८ व्या राष्ट्रीय सबज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र डाॕजबाॕल असोशिएशनच्या मुला - मुलींच्या संघास सुवर्णपदक प्राप्त.

या स्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने उत्तरप्रदेश संघास ५ गुणांनी व मुलांच्या संघाने कर्नाटक संघावर अंतिम सामन्यात ८ गुणांनी विजय मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी अजिंक्यपद पटकावून महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवले.विशेष म्हणजे यावर्षी महाराष्ट्र संघात सोलापूर जिल्ह्यातील वसंंतराव काळे प्रशालेतील कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या कु.प्रांजली काळे ( १० वी ) व कु.प्रांजली जगदाळे ( ८ वी ) या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.


मुलींच्या पहिल्या सामन्यामध्ये राजस्थान संघाविरूध्द १० गुणांच्या फरकाने विजय संपादन केला. त्यानंतर कर्नाटक , हरियाणा संघास पराभूत करून अंतिम फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले. व अंतिम सामन्यामध्ये उत्तरप्रदेश संघास पराभूत केले. महाराष्ट्र संघाचा दबदबा कायम ठेवला.

महाराष्ट्र संघातील मुला - मुलींचे सराव शिबीर गंगापूर - संभाजीनगर येथे २७ ते ३० आॕक्टोंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. या राज्य संघाचे प्रशिक्षक मा.आशिष जगताप - शरद बडे व व्यवस्थापक - कोमल गहलोद यांनी मार्गदर्शन केले.


महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळविल्याबद्दल राज्य डाॕजबाॕल असोशिएशनचे महासचिव मा.डाॕ.हनुमंत लुंगे सर (अमरावती), उपाध्यक्ष मा.राजेश जाधव (जळगांव), मा.अतुल पडोळे (अमरावती), मा.प्रफुल्ल गाभाणे (अमरावती), सोलापूर डाॕजबाॕल असोशिएशनचे सचिव मा.सुदेशजी मालप , मा.शिवाजीराव पाटील सर (मंगळवेढा) आदींनी राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक - व्यवस्थापक - खेळाडूं यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्य मुलींच्या संघात सोलापूरचे ३ मुली व १ मुलगा असे ४ खेळाडूं होते.त्यामध्ये कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या प्रांजली काळे व प्रांजली जगदाळे या दोन खेळाडूं होत्या .या खेळाडूंस प्रशिक्षक फिरोज पठाण व क्रीडाशिक्षक प्रा.संंतोष पाटील सर , गौतम लामकाने सर यांचे मार्गदर्शन लाभले.


या यशाबद्दल श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व K K स्पोर्टस् चे सर्वेसर्वा मा.कल्याणरावजी काळे साहेब , सचिव मा.बाळासाहेब काळे गुरूजी , संचालिका व मार्गदर्शिका मा.सौ.संगिताताई काळे वहिनीसाहेब , मा.विलासरावजी काळे , युवानेते मा.समाधानदादा काळे , प्राचार्य मा.डी.एस.खरात सर , पर्यवेक्षक मा.एस.ए.काळे सर , संस्थेचे सर्व पदाधिकारी , प्राध्यापक-प्राध्यापिका , शिक्षक-शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी व हितचिंतक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !