गावकऱ्यांचे सांडपाणी येते डांबरी रस्त्यावर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपर्यंत रस्त्याच्या कडेने नाली बांधली नसल्याने गावकऱ्यांचे घराचे सांडपाणी डांबरीकरण रस्त्यावर येत असल्याने बसस्थानक परिसरात दुर्गंधीसह मोटासायकलचे छोटे मोठे अपघात घडत आहेत.
बिलोली तालुक्यातील मुतन्याळ हे गाव एक छोटेसे गाव आहे. सदरील गाव हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डांबरीकरण देगलुर-बिलोली जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्यावर माळरानावर थोड्याशा उंच ठिकाणी वसलेले आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्याच्या घराचे सांडपाणी हे खाली आसलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या कडेवरून रस्त्यावर येत असल्याने बसस्थानक परिसातील दुर्गंधी पसरली आहे. तसेच पुर्णपणे रस्त्यावर घान पाणी येत असल्याने अनेकदा या रस्त्यावरून जाणाऱ्या मोटासायकलस्वार घसरून पडून छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील बसस्थानक परिसरात नालीचे बांधकाम करून सदरील सांड पाण्याची विल्हेवाट लावावे अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा