आरोग्य तपासणी सोबत औषध उपचार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
बिलोली तालुक्यातील खतगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मानव विकास योजने अंतर्गत आरोग्य शिबिर आयोजित करून गरोदर मातेसह शिशू बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
बिलोली तालुक्यातील खतगाव येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात खतगावसह आदमपूर, बडूर, अंजणी हे आरोग्य उपकेंद्र असून त्यात मिनकी, मुतण्याळ, थडीसावळी, गळेगाव, डोणगाव , बामनी, हिंगणी, दर्यापूर पोखरणी इत्यादी गावातील नागरिकांनाची आरोग्य तपासणी करत आरोग्यसेवा पुरवली जाते. या सर्व गावात असलेल्या सर्व गरोदर मातेसह स्तनांद महिला व शीशू बालकांचे खतगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ता. ३ रोजी वैद्यकीय अधिकारी निता भावठाणकर यांनी आरोग्य तपासणी करत औषध उपचार केले आहेत. यावेळी खतगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे सर्व आरोग्य सेविका , आरोग्य सेवक उपस्थित होते .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा