तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांच्या अश्वासनानंतर युवकाला खाली उतरविण्यात यश
शिवशाही वृत्तसेवा, लातूर (जिल्हा प्रतिनिधी उदयकुमार पाठक)
गुरुवार दि. 2 रोजी पाणगाव पासून जवळच असलेल्या गोविंदनगर येथे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणासाठी लखन शिवाजी चव्हाण हा मराठा बांधव आमरण उपोषणाला बसला असून जो पर्यंत आंतरवाली सराटी येथे बसलेले मनोज जरांगे पाटील आपले उपोषण सोडनार नाहीत तो पर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्धार लखन शिवाजी चव्हाण यांनी केला आहे .
त्यांच्या सोबतच असणारे नंदकुमार निळकंठ जाधव यांनी प्रशासन मराठा आरक्षण देत नसल्याने सकाळी अकरा वाजता अचानक अन्न पाणी न घेता गावातील मोबाईल टॉवरवर जावून बसले व जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत टॉवरवरून न उतरण्याचा व इथेच आपले जिवन संपवण्याचा निर्णय घेतला परंतु तब्बल पाच तासा नंतर तहसिलदार पोलीस प्रशासन व गावकरी यांच्या प्रयत्नाला यश आले. नंदकुमार निळकंठ जाधव या युवकाला खाली उतरवण्यात यश आले. त्यानंतर या युवकाला पाणी पाजून आंदोलन स्थळी सुखरूप पोहचवण्यात आले .
यावेळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना रेणापूर तहसिलदार धम्मपिया गायकवाड यांनी "तालुक्यात सहा ठिकाणी आमरण उपोषण चालू असून प्रत्येक बाबीची गोष्ट मी जिल्हाधिकारी साहेबांना कळवत असून प्रशासन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे आंदोलन शांततेच्या मार्गाने करा टोकाचे पाऊल टाकू नका", अशी विनंती केलीगोविंदनगर येथील शालेय विद्यार्थ्यांनी रेणापूर तहसिलदार धम्मपिया गायकवाड यांना जो पर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत शाळेत जाणार नाही असे निवेदन दिले .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा