चप्पल बूट बनवून करतात आंध्रप्रदेशात पार्सल
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
तीन पिढ्यांचा व्यवसाय जोमाने सुरूनायगाव तालुक्यातील बरबडा येथील दोन चुलत भाऊ शिवाजी सूर्यवंशी व पांडुरंग गंगाराम सूर्यवंशी यांनी आपल्या पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या चांभार व्यवसायाला चालना देऊन नवनवीन बूट चप्पल असे विविध प्रकारे पादत्राणे बनवुन गावातच व परिसरात तसेच जिल्ह्यातही चांगल्याच प्रकारे विक्री करत आहेत.
त्यांच्या मालाला आंध्रामध्ये व नांदेड जिल्ह्यात विशेष मागणी ही आहे. बारा बलुतेदार पैकी एक असलेले चांभार व्यवसाय त्याचा आजोबा नि सुरू केला होता. तो व्यवसाय माझ्या वडिलांनी पुढे आणला आम्ही शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न केले मात्र काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही पिढ्यान पिढी चालणाऱ्या व्यवसायाला आपल्या आर्थिक व्यवसाय जोड दिली. चांगली चालना दिली. आज हा आमचा व्यवसाय जोमाने सुरू आहे.अशी माहिती शिवाजी सूर्यवंशी यांनी सांगितले.
12 बलुकेदार नावे प्रामुख्याने घेतले जाते त्यातीलच एक चांभार व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पुरवण्यासाठी चांगल्या प्रकारे मदतही करत असतो शेतीमध्ये पायाला बूट चप्पल हवी असते. त्यामुळे ह्या विविध प्रकारचे चप्पल बूट बनवून एक प्रकारे समाजामध्ये शेतकऱ्यांची मदत करत असल्याची बोलल्या जाते.
सूर्यवंशी भावंडे हे बारावीपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या आजोबा ते वडिलांनी जे व्यवसाय सुरू केला होता पिढ्यानपिढ्या त्याच व्यवसायाकडे त्यांनी कल देऊन वेगवेगळे पादत्राणे बनवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये बूट कोल्हापुरी चप्पल लेडीज चप्पल लग्नाचे बूट शूज अशा वेगवेगळे टायर सोल , जनावरांचा कातडी, म्हणजे टायरापासून फेकून दिलेल्या वस्तू पासून त्यांनी चपला बनवून एक प्रकारे सुंदर डिझाईन बनवून त्यांनी गाव खेड्यामध्ये विकले. आता त्यांनी जागेवर बसून त्यांच्या मालाची विक्री होत असून त्यांना ऑर्डर हि मिळत आहेत. येत असतात सात ठिकाणाहून त्यांनी ऑर्डर घेऊन माल बनवून विकले जाते.
त्यामध्ये त्यांचे चुलत भाऊ शिवाजी सुर्यवंशी, पांडुरंग गंगाराम सूर्यवंशी, हे दोघे चुलत भाऊ असून या दोघांनी बसून आपला व्यवसाय आजपर्यंत नेटाने सुरू केला असू त्यांच्या व्यवसायाला आज 40 वर्ष पूर्ण झाले. असून पिढ्यान पिढी हा व्यवसाय त्यांनी आर्थिक उन्नती साधत आहेत. स्वतःची प्रगती केली आहे हे विशेष म्हणावे लागेल.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा