खाजगी शाळेत प्रशिक्षण, हा देशातील पहिलाच उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, धर्माबाद (तालुका प्रतिनिधी नारायण सोनटक्के)
शहरातील राजाराम काकाणी सहकार विद्यामंदिर ही एक इंग्रजी माध्यमाची शाळा असून ही शाळा शिक्षणा सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम खेळात अल्पावधीत प्रगती करत आहे. येथे आय.आय.एम.रायपूर तर्फे शिक्षकांसाठी 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे व्यावसायिक पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. येथील शिक्षकांना जागतिक दर्जा मिळवावा, हा ह्या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. अशी माहिती शाळेचे संचालक सुबोध काकाणी यांनी दिली आहे. या कार्यशाळेसाठी भारतीय प्रबोधन संस्थेत दीर्घकाळ अनुभवी असलेले प्रा. सुमिता सागृती आणि प्रा. डॅनियल इंबरॉज संसाधन व्यक्ती म्हणून लाभलेले आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या ह्या प्रशिक्षणात शिक्षकांना त्यांची शैक्षणिक क्षमता वाढवण्यासाठी व त्यांच्यामध्ये अस्मितेची भावना जागृत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचबरोबर समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांच्या व्यापक भूमिकेचे महत्त्व विद्यार्थ्यांना आणि पर्यायाने शिक्षकांनाही पटवून दिले पाहिजे.शिक्षक म्हणवून त्यांच्या योगदानामुळे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे.त्यामुळे विविध उपक्रमांचे आयोजन करून नवनवीन उपक्रम, शिक्षकांनी स्वयंप्रेरित व्हावे आणि स्वयंप्रेरणेची भावना जागृत करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. येथे शिक्षक व संसाधन व्यक्ती आणि परस्पर संवाद, गट कार्य, आत्मनिरीक्षण, अनुभवात्मक अध्यापन आणि तज्ञ अशा उपाययोजना आखल्या जातील. राजाराम काकाणी सहकार विद्यामंदिर या खाजगी शाळेतील सर्व शिक्षकांसाठी देशात प्रथमच तीन दिवस ही कार्यशाळा होणार आहे. ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. असे संचालक सुबोध काकाणी यांनी सांगितले आहे. यावेळी शहरातील व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा