लाखो रुपयाचे कामे निकृष्ट करणाऱ्या गुत्तेदारालाच पुन्हा दिले ईमारतीचे काम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कुंटूर चार कोटी , प्राथमिक उपकेंद्र डोंगरगाव 50 लाख कोल्हापुरी बंधारा कुंटूर 50 लाख अशा कामासाठी गुत्तेदार एक व कामे करणार दुसरा टक्केवारीवर कामे घेणाऱ्या गुत्तेदार म्हणून सुधाकर गुरुजी बरबडेकर यांनी हे कामे टक्केवारीवर घेऊन कामाचा दर्जा टक्केवारीनुसार निकृष्ट केले
असून सदर कामे आज पर्यंत निकृष्ट झालेली स्पष्ट असून सदर तिन्ही कामाची चौकशी लागली आहे. त्याच गुतेदाराला पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम दिल्याने कुंटूर येथील कामाचा दर्जा घसरला असून याला राजकीय व लोकप्रतिनिधी सहित वरिष्ठ व शासकीय कर्मचारी जिम्मेदार असल्याची नागरिकांत ओरड सुरू आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी एकूण पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून इमारत बांधकाम तसेच पशु साठी इतरही कामे होणार आहेत.सदर कामाचे टेंडर हे नक्षत्र कंट्रक्शन यांच्या नावाने निघाले असून त्या कंट्रक्शन गुत्तेदाराने टक्केवारीवर काम घेणाऱ्या सुधाकर सर्जे गुरुजी बरबडेकर यांना काम दिले .
पशुवैद्यकीय दवाखाना ईमारत फुटींग चे काम माती मिश्रीत शिलकोट वापरून करतअसल्याने ही देखील इमारत उपयोगी होणार नाही व काही दिवसातच गळतीला सुरुवात होऊन इमारत कोसळणार अशी चर्चा कुंटूर मध्ये चांगलेच रंगले असून नागरिकासहित लोकप्रतिनिधी व सरपंच याविषयी कोणीही बोलत नाही.
त्यामुळे कुंटूर येथे निकृष्ट दर्जाचे कामाचे समीकरणच झाले आहे का अशा प्रश्न चांगलंच गाजत असताना याकडे कोणीही लक्ष देत नसून कामाचा दर्जा मात्र स्पष्ट निकृष्ट होत आहे .
कुंटूर येथील प्राथमिक आरोग्यंकेद्राची इमारत पाच कोटी खर्च करून हे आज घडीला ताब्यात घेण्यास धजावत नसून सदर इमारत गळती लागली जागोजागी तडे गेले असून या इमारतीचे काम निकष दर्जाचे आहे . त्याचबरोबर उपकेंद्र डोंगरगाव येथे इमारत बांधकाम होऊन पाच वर्षे संपले देखील त्या इमारतीत कोणी जाण्यास तयारही नसून सदर इमारत ही कोसळण्यास झाली आहे .
त्याचबरोबर कुंटूर येथे कोल्हापुरी बंधारा बांधून तेही काम दिले होते मात्र त्याही रस्त्याचे काम ह्या गुत्तेदाराने मनमानी पद्धतीने केले. निकृष्ट करून पळवाटा शोधून पळून गेला पुन्हा त्याच गुतेदाराला येथील काम दिल्यामुळे नागरिक संतप्त होऊन सदर गुत्तेदाराने काम करू नये हे काम चांगल्या प्रकारे होणार नाही अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा