शेतकरी व काँग्रेस नेते मारोतराव कवळे गुरुजी यांचा निर्णय
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
उमरी तालुक्यातील आगामी नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, व विधानसभा, निवडणूका महाविकास आघाडी सोबत न लढविता काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावर निवडणूक आम्ही स्वतंत्र लढविणार आहोत अशी प्रतिक्रिया उमरी मोंढा मैदान श्रम साफल्य कवळे गुरुजी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवादाची साधतांना काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा व्हीपीके उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी दिली ते दि. ३० नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत श्रेष्टीचा आदेश डावलून ती निवडणूक झाली त्या संदर्भात बोलत होते.
पुढे बोलताना कवळे गुरुजी म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला एक हाती सत्ता मिळाली त्या अनुशंगाने काँग्रेस पक्षाच्या कोरकमिटीने सभापती,उपसभापती पदाच्या वाटाघाटी झाले त्यानुसार आघाडीचा धर्म पाळून सभापती पदासाठी काँग्रेस पक्षाने अर्ज दाखल केला नाही म्हणून सभापती पदी शिरिष देशमुख गोरठेकर बिनविरोध सभापती झाले आम्ही वरिष्ठांचे आदेशानुसार मार्केट कमिटीच्या उपसभापती पदासाठी बापूराव पाटील करकाळेकर यांचा अर्ज दाखल करण्याची सूचना दिली होती त्यानुसार आम्ही अर्ज दाखल केला.
परंतु पक्षातील एका गटाने अर्ज दाखल केले असून पक्षाचे व वरिष्ठांचे आदेश न मानता आदेश धुडकावत झालेले प्रकरण हे वरिष्ठांना कळविणार असून हे किती लोक विश्वासाला पात्र आहेत हे सिद्ध झाले. मार्केट कमिटीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत, सोसायटी सर्व बाजू भक्कम .व स्पष्ट बहुमत असताना केवळ वरिष्ठांचे आदेश म्हणून महाविकास आघाडीत राहिलो. एवढे होऊन सुद्धा उपसभापती निवडणुकीत वरिष्ठांचे व पक्षाचे विश्वासघात झाल्याची खंत व्यक्त केली असून पक्षातील कुरघोडी बाबतीत श्रेष्ठीकडे म्हणणे मांडणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा व्हिपीके उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा