अपघाताची शक्यता बळावली, सा.बा.विभाग सुस्तावला
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील गडगा कहाळा रस्त्यावर मांजरम गावाजवळ रस्त्याच्या मधोमध पडलेल्या (भगदाड) खड्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून हा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णतः बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग मुदखेड यांनी रस्त्या कडे लक्ष देऊन रस्त्यावरील भगदाड व खड्डे भरून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.
मुदखेड लातूर हायवे रस्ता म्हणून नुकताच हा रस्ता जाहीर झाला असून या रस्त्याचे काम मोठ्या जलद गतीने करून रस्ता चकाचक करण्यात आलेला आहे.या मुळे या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. परंतु मांजरम गावाजवळील शंभर मीटरचा हा रस्ता शेतकऱ्याने तांत्रिक अडचण पुढे करीत न्याय विभागात धाव घेतल्याच्या कारणावरून आडवील्यामुळे या रस्त्याचे काम तसेच राहीले आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.
तर एका राजकीय पुढार्याच्या शाळेच्या भिंती मुळे मांजरम गावा जवळील रस्त्याची रुंदी कमी केल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे.सध्या ह्या रस्त्यावर नांदेड मुखेड जाण्यासाठी वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते गेल्या अनेक दिवसापासून मांजरम गावाजवळील शंभर मीटर पडलेल्या खड्ड्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी वाहनधारकाने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग मुदखेड यांच्याकडे केली आहे. परंतु आज तागायत रस्त्यावरील खड्डे जसेच्या तसे असून आता रस्त्याच्या मधोमध एका नळकंंडी पुलाचा पाईप फुटल्याने मोठे भगदाड रस्त्यात पडले आहे. या भगदाडात दुचाकी सहज उतरेल एवढे मोठे भगदाड पडले.
असतानाही संबंधित विभागाने त्या ठिकाणी सूचनाफलक अथवा चार दगडे ठेवण्याचे औदार्य दाखविले नाही. वेळोवेळी तक्रार करूनही शंभर मीटर रस्ता जसाच्या तसा असून या ठिकाणावर अनेक मोठे अपघात झाले आहेत. आता तर भगदाड पडल्यामुळे जीव जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे .
हा रस्ता तात्काळ मुरूम वैगेरे टाकून दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करून द्यावा अशी मागणी होत आहे.शिवाय शंभर मीटर रस्त्याचा न्यायप्रविष्ठ प्रश्न कसा निकाली लागेल व शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल ही प्रक्रिया लवकरत लवकर सोडून घेऊन रस्ता खुला करून द्यावा.असी मागणी मांजरम सह इतर गावकरी व प्रवासी करीत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा