समाजाच्या सर्व स्तरातून होत आहे कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, धर्माबाद (तालुका प्रतिनिधी नारायण सोनटक्के)
धर्माबाद येथील राजाराम सहकार विद्या मंदिर शाळेतील एका गरीब कुटुंबातील मन्मथ शिवशेट्टे हा इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेणारा विद्यार्थी असुन तो आपल्या बुध्दीच्या जोरावर व सुज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जपान येथे वास्तव्यासाठी निवड झालेली आहे.
दरवर्षी संपूर्ण भारतातून AFS तर्फे 6 विद्यार्थ्यांची जपान येथे वास्तव्यासाठी निवड होत असते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय खर्चाने प्रशिक्षणासाठी जपानला पाठवल्या जाते. या वर्षी महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयातील राजाराम काकाणी सहकार विद्या मंदिर धर्माबाद या शाळेने हा बहुमान मिळवला आहे.
या शाळेतील मन्मथ विरभद्र शिवशेट्टे या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. कदाचित हा बहुमान धर्माबाच्या इतिहासात नोंद होणाऱ्या घटनेची पहिलीच वेळ असलेल्याने
व्यवस्थापकीय संचालक सुबोध जी काकाणी यांच्या वतीने परिवारसह सम्मान करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
18 नोव्हेंबर 2023 रोजी जपान येथे वास्तव्यासाठी जात असलेल्या मन्मथ ला परिवारच्या व्यकतींचे RKSVM शाळेच्या संचालक मंडल , मुख्याध्यापक व शिक्षकांनी सन्मान व आभार मानले. तसेच नांदेड व धर्माबाद येथील इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांनी बहुसंखेने उपस्थितीत राहुन मन्मथवर अभिनंदनाचा व शुभेच्छा चा वर्षाव करून सन्मान करण्यात आला. यावेळी मन्मथला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा शाळेच्या वतीने आभार मानले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा