चंद्रकांत दुडकावार यांना महात्मा ज्योतीराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
आदमपूर: बिलोली तालुक्यातील आळंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील सहशिक्षक चंद्रकांत दुडकावार यांना यंदाचा महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथे ता. १९ नोव्हेंबर रोजी प्रदान करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, देगलुर तालुक्यातील रहिवासी असलेले व बिलोली तालुक्यातील आळंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर सहशिक्षक पदावर कार्यरत असणारे चंद्रकांत गंगाराम दुडकावार हे एक तंत्रस्नेही उपक्रमशील विद्यार्थी घडवणारे सहशिक्षक आहेत. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडत आले आहेत सहशिक्षक पदावर काम करत असताना योग्य असे नियोजन तसेच शाळेतील विद्यार्थी प्रती असलेले प्रेम या सर्व बाबींचा विचार करून त्यांना या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार ही प्रदान करण्यात आला होता. शिक्षकी पेशाचे २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने त्यांनी मागील जुलै महिन्यांत संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करीत विद्यार्थ्यांना मदत केली आहे.
या सर्व बाबीचे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद पुणे या संस्थेने विचार करून यंदाचा राष्ट्रीय महात्मा ज्योतिराव फुले उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची निवड करून ता. १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे त्यांना राष्ट्रीय महात्मा ज्योतिराव फुले उत्कृष्ट पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, यांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा स्व:पत्नीसह संपुर्ण परिवाराचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल बिलोली पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी बालाजी पाटील,प्रभारी केंद्रप्रमुख नागनाथ द्याडे, सुधाकर थडके जिल्हा कार्याध्यक्ष अखिल शिक्षक संघटना तथा चेअरमन जिल्हा शिक्षण पतपेढी नांदेड,तालुकाध्यक्ष मारोती गायकवाड, काँग्रेस युवाचे जिल्हा उपाध्यक्ष जिशान देसाई, भाजपचे तालुका सरचिटणीस पुरुषोत्तम अब्दागिरे, चिटणीस शिवाजी पिकले, आळंदीचे महिला सरपंच अरुणा धर्मकरे, उपसरपंच वत्सलाबाई अब्दागिरे , सरपंच (प्र) मारोती धर्मकरे, उपसरपंच (प्र) विश्वनाथ अबदागिरे, माजी उपसरपंच (प्र) बाळासाहेब चट्टे, माजी उपसरपंच आनंदा नायगावे, सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मानंद अब्दागिरे, उज्वल चट्टे, ज्ञानेश्वर संगनाळे, तसेच आळंदी जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख सलीम, प्रभारी मुख्याध्यापक मधुकर काठेवाडे, मोतकुलवार एन. टी. , किशवे एन.पी, मानेकर जि.एम. सह सर्व शाळेतील विद्यार्थी सह गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा