मतदारसंघातील विविध रस्ते व पूल सुधारणा विकास कामांसाठी २ कोटी ६० लाख निधी मंजूर

आमदार समाधान आवताडे यांनी दिली माहिती 
MLA samadhan autade , Development of various road and bridge improvements in the constituency , mangalwedha , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी लेखाशीर्ष ३०५४-२४१९ रस्ते व पूल परिरक्षण कार्यक्रमांतर्गत गट-ब व गट-क मधील सुधारणा विकास कामांसाठी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना रस्ते व पूल सुधारणा विकासासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून २ कोटी ६० लाख निधी मंजूर झाल्याची माहिती मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.


मतदारसंघाच्या अंतर्गत विविध गावांना जोडणाऱ्या विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी व आवश्यक ठिकाणी पूल उभारण्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे. सदर विकास कामांसाठी निधीच्या रूपामध्ये तरतूद होण्यासाठी आमदार अवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन व पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू ठेवला होता. आ.आवताडे यांच्या या मागणीची दखल घेऊन संबंधित विभागाकडून हा निधी नियोजित विकास कामांसाठी वर्ग करण्यात आला आहे.


या विकास कामांमध्ये लक्ष्मी दहिवडी ते होनमाने वस्ती ग्रामीण मार्ग क्र -११३ साखळी क्र-०/०० ते १/०० ता-मंगळवेढा साठी १३ लाख, येड्राव ते कागष्ट ग्रामीण मार्ग क्र-३१ साखळी क्र-४/०० ते ५/०० ता - मंगळवेढा साठी १३ लाख, कासेगाव ते बेंदवस्ती रस्ता ग्रामीण मार्ग क्र-२१० साखळी क्र-२/०० ते ४/०० ता-पंढरपूर साठी १४ लाख, तरटगाव ते सिद्धेवाडी रस्ता ग्रामीण मार्ग क्र-८७ साखळी क्र -१/०० ते ३/०० ता-पंढरपूर साठी १० लाख, येळगी ते आसबेवाडी रस्ता रस्ता ग्रामीण मार्ग क्र-३०५ साखळी क्र-०/०० ते २/५०० साठी १० लाख, लेंडवे चिंचाळे ते चाळीस धोंडा रस्ता ग्रामीण मार्ग क्र-९१ साखळी क्र-२/०० ते ३/०० ता-मंगळवेढा साठी २० लाख, जंगलगी ते सलगर खु रस्ता ग्रामीण मार्ग क्र-३४ साखळी क्र-०/०० ते ४/०० ता-मंगळवेढा साठी २० लाख, हुन्नूर ते शिरनांदगी रस्ता ग्रामीण मार्ग क्र-६८ साखळी क्र -०/०० ते ६/५०० ता- मंगळवेढा साठी २० लाख, बोराळे ते तामदर्डी रस्ता ग्रामीण मार्ग क्र-९५ साखळी क्र -२/०० ते ४/०० ता- मंगळवेढा साठी २० लाख, बठाण ते नळी रस्ता ग्रामीण मार्ग क्र-९८ साखळी क्र-१/०० ते २/५०० ता-मंगळवेढा साठी २० लाख, 


मंगळवेढा ते घाटूळे वस्ती ग्रामीण मार्ग क्र-१७० साखळी क्र-०/०० ते २/०० ता-मंगळवेढा साठी २० लाख, वाखरी ते मुजावर वस्ती ग्रामीण मार्ग क्र- २२९ साखळी क्र-०/०० ते ३/०० ता-पंढरपूर साठी १५ लाख, गादेगाव ते गव्हाणे बागल वस्ती रस्ता (मोहन नामदेव बागल घराचा भाग) ग्रामीण मार्ग क्र-१०७ साखळी क्र-०/०० ते २/०० ता-पंढरपूर साठी १५ लाख, गोपाळपूर ते कोंढारकी रस्ता ग्रामीण मार्ग क्र-६९ साखळी क्र-०/०० ते ३/०० ता-पंढरपूर साठी १० लाख, खर्डी ते उंबरगाव रस्ता ग्रामीण मार्ग क्र-५४ साखळी क्र-०/०० ते ४/०० ता-पंढरपूर साठी १० लाख, जित्ती ते निंबोणी रस्ता जाधव वस्ती जवळ पूल बांधणे ग्रामीण मार्ग क्र-२५७ साखळी क्र-०/०० ते ०/५०० ता-मंगळवेढा साठी ६ लाख, सलगर खुर्द ते पौट रस्त्यावर पूल बांधणे ग्रामीण मार्ग क्र-३५ साखळी क्र-०/०० ते ४/५०० ता-मंगळवेढा साठी ६ लाख, हरवाळकर वस्ती जोडा रस्ता (अरळी ते हरवाळकर वस्ती) पूल बांधणे ग्रामीण मार्ग क्र-१६० साखळी क्र-०/०० ते २/०० ता-मंगळवेढा साठी ७ लाख, आंधळगाव ते महमदाबाद (शे) रस्त्यावर पूल बांधणे ग्रामीण मार्ग क्र-५२ साखळी क्र-३/०० ता- मंगळवेढा साठी ४ लाख, सोड्डी ते शिवणगी ग्रामीण मार्ग क्र-९९ साखळी क्र-०/५०० ता-मंगळवेढा साठी ७ लाख.
ग्रामीण भागातील परिपूर्ण दळणवळण सुविधांच्या अनुषंगाने मतदार संघातील जनतेला वाहतुकीसाठी सुलभता प्राप्त होत असताना सार्वत्रिक विकास होण्याच्या दृष्टीने हा भरीव निधी व वरील विकास कामे अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !