वनिकरन विभागाच्या अधिकाऱ्याची चौकशी करा जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागात दरवर्षी महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण मार्फत करण्यात येत असलेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनसामान्य माणसातून करण्यात येत असून दरवर्षी एकाच खड्ड्यात आणि त्याच जागी सामाजिक वनीकरण मार्फत वृक्षांची लागवड केली जात असल्याने त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
सदरील कामाचे नियंत्रण करण्यासाठी व लागवड करण्याच्या संदर्भात आंबुलगे या नावाच्या कर्मचाऱ्या कडून सदरचे काम केली जाते परंतु केलेल्या वृक्षांचे एक ही झाड शोधून पाहिले तर दिसत नाही अशी गत सामाजिक वनीकरण विभागानी केलेल्या लागवडीतुन दिसून येत आहे आहे.
तालुक्यातील महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग नांदेड यांच्या कडून दर वर्षी लागवड केली जाते परंतु त्यांचे पालन पोषण करण्यासाठी कोणता ही कर्मचारी नसतो दरवर्षी सदरच्या सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेले आंबुलगे यांच्या कडून केले जाते यांच्या बेजबाबदार पणामुळे वृक्ष लागवडीची वाट लागली आहे
शासनाचे ढिसाळ नियोजनामुळे कुठलेच कामे व्यवस्थित होत नसल्याने सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृक्ष लागवड केल्याचा अहवाल शासनाकडे पाठवून देत असले तरी करण्यात लेल्या वृक्ष लागवडीचे झाड एक ही जीवंत नसल्याच्या स्पष्ट चित्र दिसून येत आहे
सदरी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची चौकशी करून डबल वृक्षांची लागवड करण्यात यावी अशी मागणी बालाजी पवार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा