अवैध धंदे वाल्यांची दिवाळी पोलीस वाल्यांची भरली झोळी
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
हदगाव तालुक्यातील मनाठा, बामणी फाटा, केदारनाथ,बरडशेवाळा येथे कित्येक महिन्या पासुन खुलेआम,भरदिवसा अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरु असुन या कडे पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे
अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनी या अवैध धंद्यांच्या वारंवार तक्रारी देऊन सुद्धा प्रशासन या कडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत आहे
या नंबर दोन च्या धंदेवाल्यांना कोणत्या राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या आधी बामणी फाटा परिसरात कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री,गुटखविक्री,गांजा विक्री,मटका घेणे असे प्रकार खुले आमपणे चालु नव्हते परंतु अलीकडील एक ते दिड वर्ष्याच्या काळात या अवैध धंद्यांनी या परिसरात चांगलाच जम बसवला आहे.
भर दिवसा असे प्रकार चालू असल्याने या सर्व धंद्याना बळ देण्याचे काम पोलीस प्रशासन व त्यांचे काही दलाल करत आहेत असे जनतेतून बोलले जात आहे
मागील 2 वर्षांपूर्वी अश्याच अवैध धंदे वाल्यांनी डोके वर काढले असताना तत्कालीन मनाठा पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक श्री विनोद चव्हाण यांनी जवळचा दूरचा न पाहता बेधडक कार्यवाह्या करत या नंबर दोन वाल्यांच्या नाकात दम करत मुसक्या आवळल्या होत्या.
मात्र सद्यस्तिथीत असे होताना दिसत नाही
बामणी फाटा मार्केट हे जवळपास 22 ते 25 गावांशी संबंधित असल्यामुळे येथे हजारो लोकांची रोज रहदारी असते
याच परिसरातील कवाना येथील नंदी महाराज यात्रा,चिंचगव्हान येथील लखमादेवी यात्रा,उंचाडा येथील हरिनाम सप्ताह असे अनेक गावचे विविध धार्मिक कार्यक्रम आगामी काळात तोंडावर येऊन ठेपले असताना पोलीस प्रशासन या सगळ्या अवैध धंद्यांवर आळा घालणार की मूग गिळून गप्प बसणार या कडे सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा