वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटुर परिसरातील मोजे बळेगाव परिसरामध्ये लिंब व चिंचेचे झाडाचे वृक्ष तोडून हे सध्या कारखान्याकडे विक्री केली जात आहेत .कोणीही परवाना नसतानाही बिनधास्त झाडाची कतल करण्यासाठी झाडे विकत घेऊन कट करून कारखाना विट भट्टी ला विक्री करण्यासाठी नेत असून आपले चांगभलं करत आहे.
परवानगी वन विभाग अधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांना परवाना दिले असल्यामुळे कट्टर ची मशीन घेऊन गुत्तेदार मात्र झाडे तोडून बिनधास्त विक्री असतं
वृक्षप्रेमींना नाराजी व्यक्त केली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊन वातावरण परिणाम भोगावे लागतील मात्र वृक्ष जगले तर माणूस जगेल अशी परिस्थिती असताना सुद्धा बिनधास्त वृक्षतोड होत आहे . वनविभाग अधिकारी बिनधास्त कोणालाही परवाना देऊन मोकळे होत आसून याकडे कोणीही लक्ष दिले जात नाही व कोणावर हि कारवाई होत नाही हे मात्र विशेष आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा