सरस्वतीताई मखमले यांची सरपंच पदी वर्णी
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
स्थानिक नेत्यांच्या गटबाजीमुळे दुसरबीड गावाला गेली दिड महिन्यापासून गावाला सरपंच नव्हता ग्रामपंचायती वर राष्ट्रवादी काँगेस पक्षाची एकहाती सत्ता असताना १३ सदस्य सत्ताधारी पॅनल मध्ये असताना अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच राजीनामा नाट्य सुरू होऊन दोन गट पडले दिड महिन्यापासून सुरू असलेल्या नाराजीनाट्याचा तिढा सुटून अखेर काल ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान पार पडले.
दुपारी सरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल झाल्यानंतर १० विरुद्ध ०७ असे गुप्त मतदान होऊन सौ.सरस्वती शरदराव मखमले सरपंच म्हणून निवडून आल्या तर प्रतिस्पर्धी उमेदवार सौ. लक्ष्मी कृष्णा जऱ्हाड यांनी ०७ मते घेतली यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून श्री.साळवे यांनी मतदान जबाबदारी पार पाडली किनगाव राजा पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार युवराज रबडे यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता यावेळी शरदराव मखमले, जी. एस. देशमुख , गजानन देशमुख,सीताराम चौधरी,सतीश काळे,अबरार शेख, वैभव देशमुख, शिवाजी गुंजाळ आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा