रस्त्याचे कामासाठी सहा कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील गंगनबीड फाटा ते कुंटूर या आठ किलोमीटर रस्त्याचे काम सहा कोटी रुपयांच्या वर मंजुरी देण्यात आले असून रुंद रस्ता करून रस्त्याचा दोन्ही बाजूने नाली 4 फुट खोली व 4 फुट रूंदी नाली काडुन ,झाडे झुडपे तोडून सदर रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी शासनाकडून दिला जातो मात्र गुत्तेदाराने आपल्याच मनमानी पद्धतीने कामे करत असतात. नालीचे बांधकाम न करता झाडे झुडपे न तोडता, डायरेक्ट रस्त्यावर दबई ,पाण्याचा फवारही नसताना डायरेक्ट रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करण्याची घाई या गुत्तेदाराने केली आहे. त्यामुळे सदर डांबर समोर काम चालू होतं पाठीमागे डांबर उघडून जात.
असल्याचे चित्र दिसत आहे. गुत्तेदार मनोज मोरे यांनी सदर काम हाती घेऊन कुंटूर फाटा ते कुंटूर सांगवी धनंजय हुस्सा राहीर कडे मिळणाऱ्या ह्या एकूण वीस किलोमीटर अंतर्गत रस्त्यासाठी अंदाजे नऊ कोटी रुपयांच्या वर निधीची कामे घेण्यात आली असून दोन ते तीन टप्प्यात हे काम विभागले आहे त्यामुळे गंगनबीड फाटा ते कुंटूर पासून ते राहेर ह्या रस्ता रुंद करून त्या रस्त्यावर झाडे झुडपे तोडून . दोन्ही साईडने नाली काढून रस्त्याचे काम मजबुतीकरण करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी दिला मात्र गुत्तेदराने शक्यकल लढून रस्ता अरुंद बनवला असून डांबरीकरणाचा दहा फुटाचा रस्ता आहे. बाकी नाले नाही व झाडे झुडपे काही ठिकाणची तोडले नाही ते स्पष्ट दिसत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा