स्व. भास्करराव शिंगणे यांची पुणयतिथी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा ते बुलडाणा कै. भास्करराव शिंगणे यांचे पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .सकाळी पुण्यस्मरणरथ सिंदखेड राजा येथून देऊळगाव राजा येथे 9.30 देऊळगाव राजा बस स्टँड चौकात पोहोचला तेव्हा तिथे सर्व जाती-धर्मातील साहेबांची चाहत्यांची अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली .
सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे साहेबांनी आपल्या जीवनात अनेक पदे भूषविली व त्या पदाना न्यायही दिला . त्यांनी सभापती पंचायत समिती देऊळगाव राजा, उपाध्यक्ष जिल्हा परिषद बुलढाणा, अध्यक्ष जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुलढाणा, विधानसभा आमदार सिंदखेडराजा, अध्यक्ष मार्केटिंग फेडरेशन, अध्यक्ष कृषी औद्योगिक महामंडळ, अध्यक्ष, पणन महासंघ, अध्यक्ष ,पैनगंगा सूतगिरणी, साखरखेर्डा, विविध पदावर काम करत.
असताना समाजातील,तरुण, शेतकरी, कष्टकरी लोकांना एकत्र घेऊन त्यांच्या साठी विकासाचे काम सहकाराच्या माध्यमातून त्यांनी केलं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहकाराच्या फार मोठ जाळे निर्माण करून सर्व समाजातील घटकांना योग्य न्याय देण्याचं काम साहेबांनी केलं.तरुणांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यानं साथ देत, साहेब, समाजकारण, राजकारण ,योग्य दृष्टिकोन आणि योग्य दृष्टिकोन आणि काम करण्याची शैलीयामुळे लवकरच सर्वसामान्याच्या मनात घर केले आणि अल्पावधीत सहकार महर्षी झाले त्यामुळे साहेबांवर प्रेम करणारा खूप मोठा चाहता वर्ग बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. देऊळगाव राजा त
बस स्टँड चौकात,संतोष खांडेभराड.डॉ. रामप्रसाद शेळके , सदाशिव मुंडे ,राजू शिरसाट ,शेरे ,गंगाधरजी जाधव, अश्या अनेक मान्यवरांनी साहेबांना अभिवादन केले .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा