लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायिक गणवेश वाटप
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौभाग्यवती डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके वतीने विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायिक गणवेश वाटप करण्यात आले.
पंढरपुरातील सावरकर नगर येथील मातोश्री रत्नप्रभादेवी मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय व नूतन प्राथमिक मराठी विद्यालय या दोन प्रशालेतील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश हवे होते. गणवेश घेण्यासाठी विद्यार्थिनी सौभाग्यवती डॉक्टर प्रणिता भालके यांना साद घातली होती. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके फाउंडेशन च्या वतीने, या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायिक गणवेशाचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थापक अध्यक्षा सौभाग्यवती डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांच्या शुभहस्ते या विद्यार्थ्यांना हे गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी नवनाथ आसबे, बापू भोसले, तात्या नागणे, अक्षय मोरे, धनाजी भोईटे, आदी पदाधिकारी, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी गणवेशासाठी दिलेल्या हाकेला, लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके फाउंडेशन च्या माध्यमातून, सौभाग्यवती डॉक्टर प्रणिती भालके यांनी, तातडीने प्रतिसाद देऊन, विद्यार्थ्यांच्या गणवेशाची पूर्तता केल्यामुळे, शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी, सौभाग्यवती डॉक्टर प्रणिता भालके यांचे आभार मानले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा