आमदार समाधान आवताडे यांच्यातील संवेदनशीलतेने नाभिक समाज बांधव भारावले
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या 388 व्या जयंती निमित्त सकल नाभिक समाज वतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंढरपूर - मंगळवेढा आमदार समाधान दादा आवताडे यांनी आपली लोकप्रियता आणि जनसामान्य जनते असणारी संवेदनशीलता दाखवून दिली आहे. माणसातला देवमाणूस कसा असतो हे आमदार साहेबांनी दाखवून दिले.
हिंदवी स्वराज्य भुषण शिवाजी काशिद यांच्या जयंती निमित्त ऐन मिरवणुकीतच नाभिक समाजातील युवक कै.गणेश माने ह्या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे कै.गणेश माने त्यांच्या मुलीला आर्थिक मदत म्हणून सकल नाभिक समाजाच्या वतीने बंधू या नात्याने 25000/- त्यांच्या मुलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट करण्यात आली. त्यावेळी समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते एफडी सर्टिफिकेट कू. अनुश्री गणेश माने यांना देण्यात आली. नाभिक समाजाची आत्मियता पाहुन आमदार समाधान आवताडे यांनी स्वतःचे अजून रक्कम म्हणून 25000/- त्याच्यात वाढवून सहकार्य केले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश चव्हाण, महेश माने, बाळासाहेब देवकर, सोमनाथ खंडागळे, युवराज हडपद, अनिल सप्ताळ, दिपक खंडागळे,संतोष हिलाळ, सखाराम खंडागळे, सोमनाथ चिखले, परमेश्वर डांगे, तेजस भोसले, माऊली चव्हाण, रोहित शिंदे ,गुलशन जाधव, विठ्ठल भोसले, दत्ता जाधव, चंद्रकांत जाधव ,अविनाश शेटे, सागर खंडागळे, रमेश शिंदे, प्रशांत शेटे, सतीश भोसले, विकास वाघमारे उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा