पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आता आरक्षणाची ही शेवटचीच लढाई
![]() |
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सभेसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष,वारी परिवाराचे सदस्य प्रा.विनायक कलुबर्मे व सिद्धेश्वर डोंगरे सायकल वरती 300 किलोमीटर प्रवास करत सभा ठिकाणी जाणार आहेत सर्वसाधारणपणे दररोज शंभर किमी प्रवास ते करणार आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे-पाटील आणि असंख्य समाज बांधवांची मागणी आहे.
या मागणीसाठीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात महासभेचे आयोजन केलेले आहे महाराष्ट्रातून विविध भागातून मराठा बांधव या सभेसाठी लाखोंच्या संख्येने येणार आहेत मंगळवेढ्यातील या दोन युवकांनी सायकल वरती 300 किमी प्रवास करून त्या सभेसाठी पाठिंबा दर्शवणार आहेत याचे सर्व मराठा बांधवातून कौतुक होत आहे
आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आता नाही तर कधीच नाही मराठा आरक्षणाची ही शेवटचीच लढाई ठरावी यासाठी आपण सायकल वरती प्रवास करत सभेला जायचे ठरवले आहे-प्रा विनायक कलुबर्मे )
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा