maharashtra day, workers day, shivshahi news,

शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातुन नेवाशेकरांना शेत तिथे रस्ता मिळवून देवु - शरद पवळे

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शिवरस्ता व शेत पाणंद रस्ते अडचणीवर चर्चा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद 
Sharad Pavle , Nevasa , parner , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (तालुका प्रतिनिधी सुदाम दरेकर)
नेवासा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या शिवरस्ता व शेत पानंद रस्त्याच्या अडचणीच्या प्रश्नावर नेवासा येथे डाक बंगल्यावर (शासकीय विश्रामगृह) मध्ये शासनाच्या असलेल्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपाणंद रस्ता योजना, पालकमंत्री शेत पाणंद रस्ता योजना,महाराजस्व अभियान, सपत्पदी योजना यावर सविस्तर चर्चा करून व त्यावरील उपाय योजना यासंबंधी विशेष चर्चा व मार्गदर्शनासाठी सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी नाथा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नेवासा बुद्रुक येथील ॲडवोकेट  जानकीराम डौले, बालेंद्र पोतदार, ॲडवोकेट  महेश जामदार पाटील, ॲडवोकेट सुहास मापारी, सागर सोनटक्के, सचिन गव्हाणे, संदीप आलवने व इतर शेतकरी त्यांनी त्यांच्या रस्त्याच्या अडी-अडचनी संदर्भात मनोगत व्यक्त केले.



तसेच यावेळी पारनेर येथील श्री रामदास लोणकर यांनी शिवरस्ता व शेत पाणंद रस्ता ची भांडने शेतकऱ्यांनी एकत्रित बसून सामंजस्याने मिटवली पाहिजे,भांडण-तंटा समिटासाठी सर्व शेतकऱ्यांनी मानसिकता तयार करावी असे मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील शिवरस्ते व शेत पानंद चळवळीचे प्रणेते शरदराव पवळे  यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने असा आदेश दिला आहे की, शेतकर्यांनी तहसीलदार कडे शिवरस्ते, शेत शिवार रस्ते, खुले करण्याकरिता अर्ज केलेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर रस्ता अतिक्रमण मुक्त करून दिलाच पाहिजे. तसेच भूमी अभिलेख विभाग यांनी शिवरस्ते मोजणी कामी लागणारे कोणतेही शुल्क शेतकऱ्यांकडून आकारू नये.



शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी,शेत मेहनती करीता शेतात जा - ये करावी लागते अश्या वेळी त्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या उत्तम प्रकारचा खडीकरणयुक्त रस्ता असणे आवश्यक आहे शेत रस्ता चांगला असला तर शेतातील उत्पादित माल,उत्पन्न मार्केटला त्वरित वाहून नेता येते मार्केटला वाहतूक करता येते व मार्केटला जाऊन मालाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होतो.

त्याच प्रमाणे बहुतांश शेतकरी शेतात वस्ती करून राहतात. त्यांना शेती वस्तीवर जाण्यासाठी सुद्धा रस्ते राहिलेले नाहीत.विशेषतः त्यांना जास्त त्रास होतो. त्या शेतकऱ्यांची शाळेत जाणारी मुले,घरातील आजारी व्यक्ती यांना रस्त्याने यांना दवाखान्यात जाता येत नाही,दुग्ध व्यवसाय करणारे  शेतकरी यांना रोजच त्रास होत असतो.यासाठी सर्व रस्ते खुले करून योग्य प्रकारे मजबुती कारण करून मिळाले पाहिजे.


नेवासा तालुक्यातील सर्व रस्ते व दोन गावांच्या शिवा मधील शिवरस्ते हे अतिक्रमित झालेले असून सध्या खराब व दुरावस्थेत आहे.नेवासा तालुक्यातील दोन गावांच्या वरील शिवरस्ता हा अतिक्रमित झालेला असून या रस्त्याच्या कडेने झाडे वाढलेली आहेत त्यामुळे रस्ता अरुंद झालेला असून त्या रस्त्याने जाता येणे अवघड झालेले आहेत पूर्वी ब्रिटिश काळामध्ये शिव रस्ते हे 33 फूट रुंदीचे होते आता ते आठ दहा फुटावर आली असून काही ठिकाणी शिवरस्ते नामशेष झालेले आहेत त्या रस्त्याने ट्रॅक्टर ट्रक व बैलगाडी व मोटरसायकली व इतर साधने नेहमी नेणे आणणे अवघड होत आहे तालुक्यातील  यासाठी सर्व शिवरस्ते खुले करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

 सदर शिव रस्ते हे शासकीय खर्चाने शासकीय मोजणी करून शिव रस्त्यावरील अतिक्रमण काढणे आवश्यक झाले आहे या मागणीसाठी सर्व शेतकऱ्यांनी माननीय श्री शरदराव पवळे साहेब यांचे समवेत नेवासा तहसील कार्यालयात जाऊन नायब  तहसीलदार श्री चांगदेव बोरुडे साहेब यांना तालुक्यातील अतिक्रमित शिवरस्ते लवकरात लवकर खुले व्हावे निवेदन व सोबत औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रत दिली.तहसीलदार साहेब श्री चांगदेव बोरुडे यांनी निवेदन स्वीकारून सर्व शेतकऱ्यांना आश्वासित केले की आपले म्हणणे मान्य तहसीलदार साहेब यांना व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येईल व तालुक्यातील सर्व रस्ता केसेस झिरो पेंडन्सी करण्यात येतील याची ग्वाही दिली.यावेळी तालुक्यातील नेवासा खुर्द नेवासा बुद्रुक सुरेगाव गंगा चिंचबन खूपटी बहिरवाडी धामोरी जैनपूर सौंदाळा खडका मक्तापूर जेऊर हैबतीlहैबती. खरवंडी तामसवाडी कांगुनी बरामपुर वडाळा भैरोबा वंजारवाडी व रांजणगाव देवी भानशिवराव इतर परिसरातील अनेक शेत रस्ता पीडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री नाथाभाऊ शिंदे सुरेगावकर श्री सागर सोनटक्के नेवासा बुद्रुक ॲड.श्री.महेश जामदार पाटील ,ॲड.सुहास मापारी,श्री संतोष भाऊसाहेब शिंदे व गणेश नामदेव शिंदे सुरेगावकर इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !