कमी पटसंख्या असलेल्या शाळा वाचवण्यासाठी डॉ सौ ज्योतीताई खेडेकर मैदानात
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
जिल्हा परिषदेच्या शून्य ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून समूह शाळांचा प्रयोग करण्याचा घाट शासनाने घातला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी आजपर्यंत विविध उपाययोजना राबविल्या, परिणामी वाडी- वस्तीवरील अनेक विद्यार्थी घडले; मात्र कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यावर अन्यायकारक आहे. आजही अनेक गोरगरीब पालकांना जिल्हा परिषद शाळे शिवाय पर्याय नाही त्यामुळे या शाळा बंद करण्यात येऊ नये यासाठी डॉ सौ ज्योती ताई खेडेकर स्वतः मैदानात उतरल्या असून अशा शाळातील विद्यार्थी पालक शिक्षक यांची एक वज्रमूठ तयार करण्यात त्यांनी सुरुवात केली आहे.
खडू असताना मुका होतोय फळासुकत चाललाय विद्येचा मळाचावी तयार आहे लावायला टाळा
या बंद पडणाऱ्या शाळा वाचविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा भोकरवाडी पंचायत समिती चिखली येथील शाळेला सौ खेडेकर यांनी भेट दिली भेटीदरम्यान विद्यार्थी, पालक, शिक्षक ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. जिल्यातील 169 तसेच चिखली तालुक्यातील 15 शाळेमध्ये 0 ते 20 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करून विद्यार्थ्यांना क्लस्टर शाळेत दाखल करावे लागणार आहे. या शासन निर्णयाचा सर्व विद्यार्थी व पालकांनी तीव्र विरोध केला. शाळा बंद केल्यास वाड्यावस्त्यावरील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त करण्यात आली.शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरकार ला देण्यात आला. तेव्हा तेथे श्री गजानन भाऊ फोलाने (सरपंच) श्री संतोष भाऊ काळे (ग्रा.पं सदस्य),श्री अनंता डोंगरदिवे (उपसरपंच) मातोश्री आश्रम चे संचालक श्री प्रशांत डोंगरदिवे, श्री अमोल खेडेकर, श्री अशोक गायकवाड, श्री शिवा भाऊ गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय इंगळे सर श्री सुनील इंगळे सर व अनेक गावकरी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा