4 डिग्री सेल्सिअस तापमानात जवानांनी केला सराव
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधि आरिफ शेख)
भारत आणि अमेरिका सैन्यामध्ये Indo -US Joint Military Training दि. 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोंबर 2023 सरावाला सुरुवात झाली होती. ह्या तुकडी मध्ये 4 मराठा लाईट इन्फंट्री चे 350 जवानांनी सहभाग घेतला होता.
ह्या युद्धसरावांमध्ये नायब सुभेदार गणेश रघुनाथ सानप दुसरबीड, ता. सिंदखेडराजा. यांची निवड झाली होती. प्रशिक्षण अव्वल युद्ध कौशल्य आणि प्लॅटून कमांडर स्किल या सर्व गोष्टीवर जोर देऊन निवड करण्यात आली होती. अमेरिकेच्या अलास्का प्रांतात या युद्ध सरावाला सुरुवात झाली होती. कठीण प्रशिक्षण सैन्य कौशल्य आणि 4 डिग्री सेल्सिअस तापमानात सर्व जवानांनी सराव पूर्ण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर करून श्री गणेश सानप यांनी आपले सैन्य कौशल्य दाखवले. दोन्ही देशातील मैत्री आणि सैन्य कौशल्य अनुभव घेऊन, ही तुकडी 14 ऑक्टोंबर रोजी मायदेशी परतणार आहे. या सुपुत्राने आपल्या सिंदखेड राजा तालुक्याचे तसेच दुसरबीडचे नाव अमेरिकेमध्ये मोठे केल्याने
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा