आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नांतुन गांधी नगर झोपडपट्टी भागात क्रांक्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर ( प्रतिनिधी जगदीश कोरीमठ)
अक्कलकोट गांधी नगर झोपडपट्टी नंबर 03 आणि 05 भागातील रस्ता अतिशय खराब झाला होता, रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते. त्यामुळे नागरिकांना अतिशय त्रास होत होता. याची माहिती युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि त्या भागातील नागरिकांनी आमदार प्रणितीताई शिंदे यांना दिली असता आमदार प्रणिती शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांतुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विकास योजने अंतर्गत कार्यक्रम सन 2022-23 अंतर्गत 10 लाख रुपये निधी मंजूर केले. त्यातून अक्कलकोट रोड गांधी नगर झोपडपट्टी नंबर ३, आणि ५ भागात क्रांक्रीट रस्ता करण्यात आला तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बुद्धवंदना आणि अभिवादन करून या रस्त्याचा लोकार्पण आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तेथील नागरिकांनी आमदार प्रणितीताई शिंदे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की, गोरगरीबांच्या आशीर्वादामुळे आज तुमच्यासमोर आमदार म्हणुन उभा आहे. तुमच्या अडचणी सोडविल्यास आम्हाला समाधान मिळते. तुम्ही कधीही हाक दया आम्ही तुमच्या सेवेशी सदैव तयार आहे. भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासुन महागाई प्रचंड वाढली त्यांची सर्वात मोट्ठी झळ गोरगरीब जनतेला बसत आहे. युवकांच्या हाताला काम नाही, उद्योगधंदे बंद पड़त आहे. विडी, यंत्रमाग बांधकाम, माथाडी कामगारांचे हाल होत आहेत. रेशनवर धान्य मिळत नाही. दिन दलितांवर अत्याचार वाढले आहेत. पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून सार्वजनिक नळ बंद केल्यामुळे झोपड़पट्टी वसियांचे हाल होत आहेत म्हणून येणाऱ्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून दया.
कार्यक्रम प्रसंगी गांधीनगर भागातील ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक मुकुंद (तात्या) लोखंडे, लक्ष्मण आरे, गुलाब नदाफ,महिबूब बागवान,मुरग्याप्पा माशाळकर,अशोक बनसोडे
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गायकवाड, राहुल वाघमारे,युवराज तुपसाखरे, धुंडेश आरे, करण कांबळे,अजय दुमडे,सागर आरे, राहुल आ रे, दशरथ कांबळे,बल्ली वाघमारे, राहुल क्षीरसागर, गौतम सगळे अविनाश मोरे, विशाल माशाळकर ,सिद्धार्थ गायकवाड, प्रकाश निकंबे ,सागर गायकवाड , उचापा कोळे, या भागातील नागरिक व माता भगिनी बहुसंख्य उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा