maharashtra day, workers day, shivshahi news,

नवरात्रोत्सव काळात दांडियाचे आयोजन करणाऱ्यांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
During the Navratri festival, it is mandatory for the organizers of Dandiya to keep primary health facilities and well-equipped ambulances, Chief Minister Eknath Shinde's instructions to District Collectors, mumbai, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
नवरात्रौत्सवाच्या काळात दांडियाचे आयोजन करणाऱ्यांनी दांडियाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि सर्व सुविधांयुक्त सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दैनिक 'गुजरात समाचार'चे  संपादक निलेश दवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील निवेदन दिले होते. 
दांडिया खेळताना अनेकदा भान विसरून नाचल्याने अनेकदा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच कोरोनानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे देखील अनेक अहवालातून समोर आले आहे, बदलत्या जीवनशैलीमुळे विविध विकारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय सहाय्याची तातडीची परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे, ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी उपलब्ध करून द्यावी ,असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !