एक महिला ठार, तर दोन जखमी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
चिखली ते मेहकर रोडवरील माळखेड फाट्याजवळ समोरून नशेमध्ये वाहन चालवणाऱ्या चालकांच्या ताब्यातील दुधाच्या महिंद्रा पिक अपच्या जबरदस्त धडकेत २२ वर्षीय विवाहित महिला ठार झाली असून स्विफ्ट डिझायर मधील दोघेजण जखमी झाले आहेत, या भिषण अपघातात दीड वर्षाचा चिमुकला मुलगा सुखरूप बचावला आहे.
चिखली तालुक्यातील एकलारा येथील सौ.पुनम राहुल माळणकर ( वय २२ वर्ष ) ही विवाहित महिला आपल्या वडीलाकडे म्हणजेच शेलु जिल्हा परभणी येथे माहेरी गेलेली होती दि ११ ऑक्टोबर २३ रोजी पूनमला तिच्या सासरी आणून घालण्यासाठी तिच्या वडिलांनी स्विट डिझायर गाडी ( क्र एम एच २२ ए एम ४८५८ ) भाड्याने करून तिला आणून घालत असतांनाच ग्राम एकलरा पासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतर असलेल्या चिखली मेहकर रोडवरील आमखेड- माळखेड दरम्यान दुपारी साडेबारा वाजता चिखली कडून मेहकरकडे भरधाव वेगाने आणि नियंत्रण नसलेल्या स्थितीमध्ये प्रचंड नशेत असलेल्या दुधाचे वाहन महिंद्रा पिकअप ( क एमएच १७, ०१५१ ) च्या चालकाने आपल्या नियंत्रणातील वाहन स्विफ्ट डिझायर कारवर धडकवल्याने या यामध्ये स्विफ्ट डिझायरचा मागील दरवाजा तुटला व पुनम गाडी बाहेर फेकल्या गेली यामध्ये तिच्या डोक्याला व हाताला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.
सुदैवाने तिचा दिड वर्षाचा चिमुकला मुलगा चिकू हा पूनम व तिच्या वडिलांच्या मध्ये बसलेला असल्याने सुखरूप बचावला. अपघातामध्ये सुनील दत्तात्रय रत्नपारखी, सुमित रमेश दायमा दोघेही राहणार सेलू यांना किरकोळ मार लागला तर स्विफ्ट डिझायरचा चालक हनुमान सुंदरराव काळे हे सुद्धा जखमी झाले आहेत हनुमान सुंदरराव काळे च्या तक्रारीवरून आरोपी शैलेश उत्तम यादव ( रा कवठे महाकाळ, तालुका संगमनेर जिल्हा नगर ) विरुद्ध चिखली पोलिसांनी अ प क्रमांक ७७/२३ कलम २७९, ३३७,३३८, ३०४ अ अनुसार गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले आहे, तर सायंकाळी आठ वाजे पर्यंत सुद्धा आरोपीची नशा कमी झालेली नव्हती म्हणजेच तो दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गाडी चालवत असतांना किती प्रचंड नशेत असेल त्याची कल्पना न केलेलीच बरी .
हनुमंत काळेनी सांगितली आप बितीआमची गाडी ६० ते ७० च्या वेगाने होती एकलाराकडे येणारे वळण अवघ्या दीड किलोमीटरवर आलेले असल्याने आम्ही सावकाश चाललो होतो दरम्यान समोरून येणारे महिंद्रा पिक अप डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे असे झकुल्या खात होते हे आम्ही बघत असतांनाच त्याने आमच्या समोरील अपेला कट मारून डावीकडे वळण घेतले होते अशातच क्षणार्धात त्याने आमच्या गाडीकडे वळण घेतले मी गाडी खुप खाली घेतली मात्र त्याने थेट आमच्या गाडीला धडक दिली आणि दुर्दैवाने अपघात घडला असे स्विफ्ट डिझायरचा चालक हनुमान काळे यांनी सांगितले यावेळी या परिसरातील नागरिकांनी धावपळ करून आम्हाला रुग्णालयात भरती केले आणि नशेत असलेल्या त्या चालकाला पकडून ठेवले. या अपघातामुळे एकलारा येथील माळणकर कुटुंबावर अतिशय दुःखाचे सावट पसरले आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा