कंपन्यांच्या छुप्या व्याजामुळे महिला होत आहेत कर्जबाजारी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील ग्रामीण भागातील अनेक मायक्रो फायनान्स कंपन्या कार्यरत आहेत . या कंपन्यांची ग्रामीण भागात असलेल्या बचत गटातील महिलांना कर्जाची सवय लावली आहे. याचा परिणाम ग्रामीण महिलावर होत असून कंपन्यांच्या छुप्या व्याजामुळे महिला कर्जबाजारी होत आहेत . यामध्ये शेकडो महिला बचत गट उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी होत आहे . गेल्या काही वर्षांमध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांचे जाळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढले आहे .सुरुवातीच्या दिवसांमध्ये बहुतांश महिला बचत गटामध्ये सहभाग असायचा त्याशिवाय आज घडीला देखील महिला सर्व बचत गटाच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबित आहेत . त्याशिवाय उपक्रमाच्या माध्यमातून या महिला गटांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे .
ग्रामीण भागात सध्या कार्यरत असलेल्या अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागात असलेल्या बचत गटातील महिलांना टार्गेट करत कर्जाची सवय लागली आहे. याचा परिणाम ग्रामीण महिलावर होत असून कंपन्यांच्या छुप्या व्याजामुळे महिला कर्जबाजारी होत आहेत.. गेल्या तीन ते चार वर्षाच्या कालावधी मायक्रो फायनान्स कंपन्यांचे जाळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढले आहे विशेष म्हणजे केवळ एकच फायनान्स कंपनी नसून अनेक फायनान्स कंपनी इतरही कंपनी आहे. त्यामुळे सर्व कंपन्यांनी ग्रामीण भागातील आपले जाळे पसरविले आहेत. आणि याच जाळ्यामध्ये अनेक महिला कर्जबाजारी होत आहेत . कर्जानंतर वसुलीसाठी सक्त तगादा लावल्या जात आहे. या सर्व प्रकाराला महिला वर्ग त्रासला असून याकडे आता संबंधित पंचायत समिती विभाग व तहसीलदार विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा