शिवसेनेचे सिंदखेड राजा तालुकाप्रमुख वैभव देशमुख थोडक्यात बचावले...!
शिवशाही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, प्रतिक सोनपसारे बुलढाणा
मुंबईला दसरा मेळाव्याला जात असताना जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळील भारत पेट्रोलपंपावर शिवसेनेचे तालुका प्रमुख वैभव देशमुख यांच्या उभ्या असलेल्या टाटा नेक्सन गाडीला एका ट्रकने मागून येऊन धडक दिली ,घटनेची माहित मिळताच सिंदखेडराजा मतदार संघाचे माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर तातडीने घटना स्थळी दाखल झाले,
या वेळी गाडीत बसलेले गजेंद्र देशमुख ,दत्ता सोंळके रत्नाकर वायाळ यांची माजी आमदार खेडेकर यांनी विचारपूस केली ,तसेच घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यालयातून फोन येऊन विचारपूस करुन सदर घटनेची माहिती घेण्यात आली,काही मदत हवी असल्यास तात्काळ मदत करतो असे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांना सदर घटना कळताच यांनी फोन द्वारे विचारपूस केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा