maharashtra day, workers day, shivshahi news,

भाजपच्या जिल्हाध्यक्ष विरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

परवानगी शिवाय आंदोलन केल्याने झाली कारवाई
A case has been registered against the district president of BJP in Khamgaon city police station, Action was taken for protesting without permission, khamgaon, buldhana, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा पोलिसांच्या विनापरवानगी जाळल्या प्रकरणी भाजपच्या जिल्हाध्यक्षाविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जमावबंदी आदेश लागू असताना या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली.
टॉवर चौकातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वात चार ते पाच कार्यकर्ते हे आंदोलन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असता यामध्ये जिल्हाध्यक्षांसह चार ते पाच जण तिथे दिसले. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून महाविकास आघाडीच्या विरोधात नारेबाजी करीत पुतळा दहन केला. या सर्वांनी यासंदर्भात कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता विना परवानगी एकत्र आले. 
तसेच त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे सरकार पक्षातर्फे पोलिस जमादार विनोद सखाराम राठोड (४८) खामगाव शहर पोलिस स्टेशन) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल करीत भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख व इतर चार ते पाच कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !