पार्थिवावर आज मुळ गावी अंत्यसंस्कार
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
भारत मातेचे रक्षण करताना देशातील अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते या जवानाला वीरमरण आले .मागील वर्षी वादग्रस्त ठरलेल्या अग्निवीर योजनेद्वारे अनेक तरुण सैन्यात भरती झाले .यातील एक जवानाला देशाचे रक्षण करताना हौतात्म्य आले. लडाखच्या सियाचीन ग्लेशियर मध्ये तैनात असलेले अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना हौतात्म्य आले. अक्षय शहीद झाल्यानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारतमातेच्या सुपुत्राला श्रद्धांजली वाहिली अशातच काँगेस नेते राहुल गांधी यांनी अक्षयच्या कुटुंबियांसाठी आवाज उठवला आहे.
राहुल गांधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका करताना म्हणाले की अक्षय गवते शहीद झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना एक जवान देशासाठी शहीद झाला पण ग्रॅच्युइटी नाही त्यांच्या सेवे दरम्यान कोणत्याही सुविधा नाहीत आणि शहीद झाल्यावर त्यांच्या कुटुंबाला पेन्शन देखील नाही अग्णिवीर म्हणजे भारताच्या वीरांचा अपमान करण्याचा डाव आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना पेन्शन देण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा