डॉ युवराज म्हस्के महिलेसाठी ठरले देवदूत...
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी, प्रतिक सोनपसारे बूलडाणा
डॉक्टरांना उगीच देवाचे स्थान दिले जात नाही.. कारण त्याचाच प्रत्यय आज या ठिकाणी आला आहे सिंदखेड राजा तालुक्यातील जांभोरा या गावी ३५ वर्षीय नर्मदाबाई खरात ह्या रात्री १ वाजता आपल्या दोन मुलांसोबत घरात झोपलेल्या असताना कोब्रा जातीच्या विषारी सापाने चावा घेतला साप चावल्याचे समजताच त्यांनी बाजूच्या खोलीतील झोपलेल्या सासू सासरे यांना सांगितले त्यांनी तेवढ्याच रात्री तात्काळ त्यांना सिंदखेड राजा येथील डॉ. युवराज म्हस्के यांच्या जिजाऊ हॉस्पिटल येथे भरती केले डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून आणि आपले वैद्यकीय कौशल्य पणाला लाऊन त्या महिलेचा जीव वाचवला... त्या मुळे डॉ.युवराज म्हस्के यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा