maharashtra day, workers day, shivshahi news,

राहेरी पुलावर लूटमार करणारे आरोपी ५ दिवसात जेरबंद बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

एक आरोपी दुसरबीडचा किराणा दुकानदार
Robbery accused jailed,Performance of Buldhana Local Crime Branch, shivshahi news, Buldhana, sindkhed Raja, dusarbid

शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)   
सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव ते राहेरी फाट्यावर दुकानाची वसुली घेऊन जाणाऱ्या कामगाराचा पाठलाग करून तसेच डोळ्यात मिरचीपूड टाकून ४ लाख ४३ हजार ३७२ रुपयांची रक्कम लुटणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांनी ५ दिवसातच जेरबंद करण्याची कामगिरी केली आहे.
सदर घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली असून बाळू भागाजी मकळे वय २६ वर्षे राहणार छत्रपती संभाजीनगर येथील आंबडेकरनगर,रामेश्वर उर्फ परश्या अंकुश हिवाळे वय २८ वर्षे, आकाश प्रभाकर साळवे वय २५ वर्षे दोघेही राहणार मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर, अजय संजय जाधव वय २४ वर्षे राहणार सूतगिरणी गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर अशी नावे असलेल्या दरोड्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या आरोपींना दिनांक २४ ओक्टॉबर रोजी अटक केली आहे. तर दरोड्याचा कट रचणारे व दरोडा घडवून आणण्यासाठी मदत करणारे व दुसरबीड येथील वॉर्ड क्रमांक २ येथे राहणारे कैलास गबाप्पा जितकर वय ४४ वर्षे आणि छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव परिसरात राहणाऱ्या लक्ष्मी मधुकर बोरुडे वय ४३ वर्षे या आरोपींना दिनांक २५ रोजी अटक केली असून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. 
सदर घटनेमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते.त्यामुळेच घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी.महामुनी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन देऊळगावराजा कार्यालय उपविभागीय अधिकारी अजयकुमार मालवीय, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक लांडे, यांनी तीन पथके तयार करून अभिलेखांवरील आरोपीचा तपास करून, गोपनीय माहितीच्या आधारे सखोल व बारकाईने तपास करून सदर प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेतला व अत्यंत कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला. सदर आरोपींजवळील २ लाख १२ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम, ४ मोबाईल फोन, २ दुचाकी वाहने असा एकूण ३ लाख ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !